Green tea पिताना करू नका ‘या’ चुका!

आज आपण ग्रीन टीच्या फायद्यांबद्दल बोलणार आहोत, परंतु काही लोकांना ग्रीन टी चे सेवन करण्याची योग्य पद्धत माहित नसते आणि ते पिताना काही चुका होतात. ग्रीन टी पिताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. अन्यथा त्याचे फायदे मिळण्याऐवजी नुकसान होऊ लागेल आणि त्याचे दुष्परिणाम आरोग्यावर दिसू शकतात.

Green tea पिताना करू नका या चुका!
green tea benefits side effects
| Updated on: May 17, 2023 | 12:19 PM

मुंबई: वजन झपाट्याने कमी करायचे असेल, त्वचा चमकदार करायची असेल, पचनक्रिया सुधारायची असेल किंवा शरीरात ऊर्जेची गरज असेल तर ग्रीन टी चे सेवन आपल्या मनात सर्वात आधी येते. हा एक चहा आहे ज्याचे अनेक छुपे फायदे आहेत. आजकाल जगभरात ग्रीन टी पिणाऱ्यांची संख्या खूप जास्त झाली आहे. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठीही ग्रीन टी प्रभावी आहे. कर्करोग, कोलेस्टेरॉल, रक्तदाब आणि हृदयरोगातही हे फायदेशीर आहे. आज आपण ग्रीन टीच्या फायद्यांबद्दल बोलणार आहोत, परंतु काही लोकांना ग्रीन टी चे सेवन करण्याची योग्य पद्धत माहित नसते आणि ते पिताना काही चुका होतात. ग्रीन टी पिताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. अन्यथा त्याचे फायदे मिळण्याऐवजी नुकसान होऊ लागेल आणि त्याचे दुष्परिणाम आरोग्यावर दिसू शकतात.

ग्रीन टी पिताना करू नका या चुका

  1. ग्रीन टी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात हे तुम्हाला माहित असेलच, पण काही लोक त्याचे अतिसेवन करू लागतात. कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन आरोग्यास हानी पोहोचवू शकते. त्यामुळे गरज असेल तेव्हाच ग्रीन टी प्या. जर आपण ग्रीन टीचे जास्त सेवन केले तर यामुळे चिंता, निद्रानाश आणि पाचन समस्या उद्भवू शकतात.
  2. ग्रीन टीमध्ये कॅफिन देखील असते, म्हणून जर आपण रात्री त्याचे सेवन केले तर त्याचा झोपेवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रात्री ग्रीन टीचे सेवन करणे टाळावे. झोपण्यापूर्वी कधीही याचे सेवन करू नका.
  3. रिकाम्या पोटी सेवन करू नका: काही लोकांना सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याची सवय असते. अशावेळी ते लोक ग्रीन टी घेतात. जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टीने आपल्या दिवसाची सुरुवात केली तर ही चूक तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरेल. खरं तर ग्रीन टीमध्ये टॅनिन असते, जे पोटात अॅसिड तयार करतात. त्यामुळे रिकाम्या पोटी याचे सेवन करू नका.
  4. जेवणानंतर लगेच पिऊ नका जर तुम्ही जेवण केल्यानंतर लगेच ग्रीन टी पिण्याची चूक करत असाल तर ती दुरुस्त करा. कारण यामुळे अन्नातून पोषक द्रव्ये मिळण्यात अडथळा निर्माण होतो. जेवणानंतर लगेचच त्याचे सेवन लोह शोषणात अडथळा आणते, ज्यामुळे अशक्तपणा होऊ शकतो. अन्न खाल्ल्यानंतर 1-2 तासांनी तुम्ही आरामात ग्रीन टी पिऊ शकता.
  5. ग्रीन टी बॅगचा पुनर्वापर करू नका: काही लोक ग्रीन टी बॅगचा पुनर्वापर करतात. आपण हे करू नये हे लक्षात ठेवा. कारण चहाच्या पिशव्या पुन्हा वापरल्याने चहाची चव खराब होईल. ग्रीन टी मध्ये नेहमी ताजे पान वापरावे.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)