AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SL vs ZIM : झिंबाब्वेकडून पुन्हा उलटफेर, ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंकेला दणका, 6 विकेट्सने दणदणीत विजय

Sri Lanka vs Zimbabwe Match Result : झिंबाब्वे क्रिकेट टीमने श्रीलंकेला पराभूत करत मोठी कामगिरी केलीय. झिंबाब्वे बी ग्रुपमधून टेबल टॉपर ठरलीय.

SL vs ZIM : झिंबाब्वेकडून पुन्हा उलटफेर, ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंकेला दणका, 6 विकेट्सने दणदणीत विजय
Sikandar Raza And Brian Bennett SL vs ZIMImage Credit source: @ZimCricketv X Account
| Updated on: Feb 19, 2026 | 8:29 PM
Share

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत बी ग्रुपमधील झिंबाब्वे क्रिकेट टीमने ऐतिहासिक कामगिरी केलीय. झिंबाब्वेने साखळी फेरीतील आपल्या चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात सहयजमान श्रीलंकेला मोठा झटका दिला आहे. झिंबाब्वेने ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंकेला पराभूत करत उलटेफर केला आहे. श्रीलंकेने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या सामन्यात झिंबाब्वेसमोर 179 धावांचं आव्हान ठेवलं होतं. झिंबाब्वेने हे आव्हान 3 बॉलआधी 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. झिंबाब्वेने 19.3 ओव्हरमध्ये 6 विकेट्स राखून 182 धावा केल्या.

ओपनर ब्रायन बेनेट आणि टोनी मुनयोंगा या जोडीने झिंबाब्वेला विजयापर्यंत पोहचवलं. ब्रायन बेनेट याने सर्वाधिक योगदान दिलं. ब्रायनने 48 बॉलमध्ये 8 फोरसह नॉट आऊट 63 रन्स केल्या आणि झिंबाब्वेला विजयी केलं. टोनी मुनयोंगा याने 3 चेंडूत 1 सिक्ससह निर्णायक 8 धावा जोडल्या. कॅप्टन सिंकदर रझा याने 4 सिक्स आणि 2 फोरसह 26 बॉलमध्ये झंझावाती 45 धावा केल्या. तदिवानाशे मारुमणी आणि रायन बर्ल या दोघांनीही विजयात योगदान दिलं. मारुमणी याने 26 चेंडूत 34 धावा केल्या. तर रायने 23 धावा जोडल्या. झिंबाब्वेने यासह सलग आणि एकूण तिसरा विजय मिळवला. तर झिंबाव्वेचा साखळी फेरीतील 1 सामना हा पावसामुळे रद्द झाला. झिंबाब्वेने यासह साखळी फेरीत एकूण 7 गुण मिळवले. झिंबाब्वे यासह बी ग्रुपमधून टेबल टॉपर ठरली.

श्रीलंकेची बॅटिंग

त्याआधी श्रीलंकेने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचं ठरवलं. श्रीलंकेच्या पहिल्या 4 फलंदाजांनी केलेल्या खेळीच्या जोरावर सहयजमान संघाने झिंबाब्वे विरुद्ध 7 विकेट्स गमावून 178 धावांपर्यंत मजल मारली. ओपनर पाथुम निसांका याने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या शतकी खेळीनंतर झिंबाब्वे विरुद्ध अर्धशतक झळकावलं. पाथुमने 41 बॉलमध्ये 62 रन्स केल्या. कुसल परेरा याने 22 धावंचं योगदान दिलं. पवन रथनायके याने 25 चेंडूत 44 धावा करत फटकेबाजी केली. दुनिथ वेल्लालागे याने अखेरच्या क्षणी नाबाद 15 धावा जोडल्या. तर कुसल मेंडीस याने 14 रन्स केल्या. झिंबाब्वेलाठी ब्लेसिंग मुझारबानी, ब्रॅड एव्हान्स आणि ग्रेमी क्रिमेर या त्रिकुटानी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.

झिंबाब्वेकडून ऑस्ट्रेलियाची शिकार

दरम्यान झिंबाब्वेने याआधी 13 फेब्रुवारीला वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टीमला दणका दिला होता. झिंबाब्वेने ऑस्ट्रेलियावर 23 धावांनी मात केली होती. झिंबाब्वेची ऑस्ट्रेलियाला टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत पराभूत करण्याची ही दुसरी वेळ ठरली. झिंबाब्वेने याआधी 2007 साली पहिल्याच टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला पराभवाची धुळ चारली होती.

Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....