AI India Summit | नवी दिल्लीत इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 चे उद्घाटन; नरेंद्र मोदींकडून जागतिक नेत्यांचे स्वागत
राजधानी नवी दिल्ली येथे ‘इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. भारत मंडपम येथे पार पडणाऱ्या या AI समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांचे स्वागत केले. ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ या थीमवर आधारित असलेल्या या शिखर परिषदेचा उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाला समावेशक विकास, जागतिक सहकार्य आणि सुरक्षित तांत्रिक भविष्यासोबत जोडणे हा आहे.
राजधानी नवी दिल्ली येथे ‘इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. भारत मंडपम येथे पार पडणाऱ्या या AI समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांचे स्वागत केले. ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ या थीमवर आधारित असलेल्या या शिखर परिषदेचा उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाला समावेशक विकास, जागतिक सहकार्य आणि सुरक्षित तांत्रिक भविष्यासोबत जोडणे हा आहे. ‘लोक, ग्रह आणि प्रगती’ या तीन महत्त्वपूर्ण स्तंभांवर आधारित धोरणांद्वारे AI चा वापर मानवकल्याणासाठी कसा करता येईल, यावर या परिषदेत सखोल चर्चा होत आहे. समिटदरम्यान बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, भारतात या समिटचे आयोजन होणे हा केवळ देशासाठीच नव्हे, तर संपूर्ण ग्लोबल साऊथसाठी अभिमानाचा विषय आहे. भारत जागतिक स्तरावर जबाबदार आणि सर्वसमावेशक AI विकासासाठी नेतृत्व करण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Published on: Feb 19, 2026 05:29 PM
KDMC तील डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या शिंदेंच्या कार्यकत्यांवर थेट कारवा
सचिन अहिर पहिला बॉम्ब... आता अजून स्फोट होणार!
शरद पवार सत्तेत जाण्याच्या चर्चेदरम्यानच आणखी वेगळंच घडलं! पक्षातील
राजकीय हालाचालींना वेग! संजय राऊतांचं नितेश राणेंना पत्र, थेट म्हणाले

