तज्ज्ञांनी सांगितले दुधासोबत मखाने खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

दूध आणि मखाना दोन्हीमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. अशा परिस्थितीत बरेच लोक दोन्ही एकत्र खातात. उन्हाळ्यात हे मिश्रण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. चला जाणून घेऊया याबद्दल तज्ञांकडून.

तज्ज्ञांनी सांगितले दुधासोबत मखाने खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Jun 12, 2025 | 2:25 PM

आजकालच्या धावपळीच्या जीवनात तंदुरस्त राहणे हे एक आव्हान बनले आहे. कारण याचे आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. अशातच खाण्या पिण्याच्या वाईट सवयी आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण करतात. तर या धकाधकीच्या रोजच्या जीवनात निरोगी राहण्यासाठी तुमच्या आहारात मखाना आणि दुध यांच समावेश करा. मखाना हा एक सुपरफूड मानला जातो. हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच या मखान्याचे तुम्ही जर दुधासोबत सेवन केल्यास त्याचे आरोग्यदायी फायदे मिळतील. चला तर मग आजच्या या लेखात आपण मखाना आणि दुध या दोघांचे मिश्रण एकत्रित करून सेवन केल्यास कोणते आरोग्यदायी फायदे मिळतात ते जाणुन घेऊयात…

दुधात कॅल्शियम, प्रथिने, व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन डी आणि फॉस्फरस असे अनेक पोषक घटक आढळतात. दूधाच्या सेवनाने आपली हाडे मजबूत होण्यास मदत करते. याशिवाय शरीराला ऊर्जा प्रदान करण्याचा एक चांगला स्रोत आहे. दूध शरीराला आवश्यक पोषक तत्वे प्रदान करते.

तर मखान्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स सारखे पोषक घटक देखील असतात. याचे नियमित सेवन केल्याने पचन सुधारण्यास, हाडे मजबूत करण्यास, वजन कमी करण्यास आणि शरीराला ऊर्जा प्रदान करण्यास मदत होते.

यावेळी आहारतज्ज्ञ सुरभी पारीक सांगतात की, उन्हाळ्यात दूध आणि मखाना एकत्र खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे नाश्त्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, तुम्ही त्यासोबत काही नट्स देखील खाऊ शकता. दूध आणि मखाना हे दोन्ही कॅल्शियम आणि फॉस्फरसचे चांगले स्रोत आहेत. त्यातच मखाना आणि दूध या दोघांचे मिश्रण हाडे मजबूत करण्यास मदत करू शकतात. ज्यामुळे कमकुवत हाडांमुळे होणाऱ्या समस्या टाळता येतात.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की दूध आणि मखाना एकत्र खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती आणि पचन दोन्ही सुधारण्यास मदत होते. ते हृदयाच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. कारण मखान्यात अँटीऑक्सिडंट्स आढळतात.

दूध आणि मखाना हे देखील प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत. याशिवाय, दोघांमध्येही थंडावा असतो. त्यामुळे ते शरीराला थंडावा देण्यास मदत करतात. दूध आणि मखाना खाण्यापूर्वी, मखाना 1 तास दुधात भिजवा. त्यानंतर तुम्ही ते खाऊ शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)