Health Tips: रक्तशुद्धीकरण केल्याने अनेक आजारांचा धोका होतो कमी, हे आहेत उपाय

| Updated on: Sep 05, 2022 | 4:33 PM

आपल्या संपूर्ण शरीरात ऑक्सीजनपासून ते हार्मोन्सपर्यंत रक्ताची महत्वाची भूमिका असते. अशा वेळी रक्तामध्ये अशुद्धता आल्यास ते संपूर्ण शरीरासाठी नुकसानदायक ठरते.

Health Tips: रक्तशुद्धीकरण केल्याने अनेक आजारांचा धोका होतो कमी, हे आहेत उपाय
रक्त शुद्धीकरण
Image Credit source: Social Media
Follow us on

आपल्या संपूर्ण शरीरात ऑक्सीजनच्या प्रसारापासून ते हार्मोन्सपर्यंत रक्ताची (Blood) महत्वाची भूमिका असते. अशा वेळी रक्तामध्ये अशुद्धता आल्यास ते संपूर्ण शरीरासाठी नुकसानदायक ठरते. याच कारणामुळे आरोग्य तज्ज्ञ सर्व लोकांना असा सल्ला देतात की, रक्त शुद्ध (Blood Purification) ठेवू शकेल अशा उपायांचा अवलंब करावा. रक्त शुदध रहावे आणि विषारी तसेच टाकाऊ पदार्थांपासून मुक्त ठेवण्यात आहाराची मुख्य भूमिका असते. यासाठी आयुर्वेदात अशा अनेक पद्धती सांगण्यात आल्या आहेत, ज्या रक्त स्वच्छ करण्यास आणि शरीर निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात. तसं बघायला गेलं आपलं शरीर स्वत:च रक्तातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकून ते स्वच्छ (Clean) करतं. यकृत आणि किडनीमध्ये ही प्रक्रिया सतत सुरू असते.

मात्र मद्यपान, आहाराच्या अयोग्य सवयी आणि औषधांचे अतिरिक्त सेवन केल्यामुळे, या अवयवानांही रक्त फिल्टर करणे कठीण जाते. अशा परिस्थितीमध्ये रक्तातील अशुद्धी वाढू लागते, ज्याचा शरीरावर अनेक प्रकारे नकारात्मक प्रभाव दिसू लागतो. रक्तीतील अशुद्धत काढून टाकण्यासाठी काही पदार्थांचे सेवन केल्यास आपल्याला मदत होऊ शकते. याबद्दल जाणून घेऊया.

पुरेशा प्रमाणात पाणी पिणे गरजेचे –

रक्त स्वच्छ ठेवणे आणि टाकाऊ पदार्थांपासून मुक्त ठेवण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे, भरपूर प्रमाणात पाणी पिणे. पाणी पित राहिल्याने किडनीचे कार्य सुलभ रितीने होते. पाण्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या खुल्या राहण्यासही मदत होते, ज्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. नॅशनल किडनी असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, तुमची लघवी हलक्या पिवळ्या रंगाची किंवा रंगहीन असेल, तर याचा अर्थ तुमच्या किडनीचे कार्य नीट चालू आहे. आणि आपले रक्त टाकाऊ पदार्थांपासून मुक्त आहे.

हे सुद्धा वाचा

कॉफीचे प्रमाण कमी ठेवावे –

कॉफी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे अनेक अभ्यासांत नमूद करण्यात आले आहे. कॉफी पिण्यामुळे यकृतावर संरक्षणात्मक परिणाम होऊ शकतो. काही अभ्यासाातून अशी माहिती समोर आली आहे की, कॉफी पिण्यामुळे यकृताचे तीव्र आजार असलेल्या लोकांमध्ये सिरोसिसचा धोका कमी होतो. यकृताचे कार्य अधिक चांगले ठेवण्यासाठी एका ठराविक प्रमाणात कॅफिन देखील फायदेशीर ठरू शकते. मात्र, हे नेहमी लक्षात ठेवावे की कॉफीचे सेवन संयमित प्रमाणात केले पाहिजे. त्याचे अतिरिक्त सेवन आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते.

सफरचंद खाल्यानेही मिळतो फायदा –

सफरचंद हे एक असे फळ आहे, जे तज्ज्ञांना रक्त शुद्धीकरणासाठी लाभदायक वाटते. सफरचंदामध्ये पेक्टिन नावाचे एक विघटनशील फायबर मुबलक प्रमाणात असते. विघटनशील फायबर पल्या रक्तातील साखरचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. हाय ब्लड प्रेशरमुळे किडनीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे किडनीचे कार्य सुरळीतपणे चालू शकेल, अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे. यामध्ये सफरचंदाचा वापर तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.

कडुलिंबाच्या पानांचे सेवन –

रोज रिकाम्या पोट कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्यास रक्त शुद्ध होण्यासोबतच शरीरासाठी अन्य प्रकारेही फायदेशीर ठरते. कडुलिंबाच्या पानांमध्ये असे गुणधर्म असतात जे रक्तातील अशुद्धता कमी करतात. या पानांच्या सेवनामुळे मुरुम, एक्जिमा आणि पुरळ इत्यादी त्वचेच्या समस्याांचा धोका कमी होतो. हे रक्त शुद्धीकरणाचे कार्य करते आणि कचऱ्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांपासून त्वचेसह शरीराच्या अवयवांचे संरक्षण करण्यास मदत करते.