
खरं पाहिलं तर, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपल्याला सर्वात जास्त विसर पडतो तो म्हणजे स्वतःच्या आरोग्याचा. आपल्या दैनंदिन आयुष्यात सकाळचा काळ हा सर्वात मौल्यवान असतो. कारण जसा दिवसाची सुरुवात तशीच संपूर्ण दिनचर्याही घडते. जर सकाळ सकारात्मक आणि आरोग्यदायी सवयींनी भरलेली असेल, तर शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यालाही त्याचा चांगला फायदा होतो.
अनेक आरोग्य तज्ज्ञांनी अभ्यासातून सिद्ध केले आहे की सकाळी योग्य दिनक्रम पाळल्यास पचनसंस्था सुधारते, वजन नियंत्रणात राहते आणि शरीरातील इम्युन सिस्टीम मजबूत होते. यामध्ये काही खास सवयींचा समावेश होतो, ज्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनशैलीचा भाग बनवाव्यात.
तांब्याचं पाणी अनेक वर्षांपासून आयुर्वेदात गुणकारी मानलं गेलं आहे. रात्री झोपण्यापूर्वी तांब्याच्या लोट्यात ठेवलेलं पाणी सकाळी उपाशीपोटी प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर टाकली जातात. हे नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन शरीरासाठी खूप उपयुक्त ठरतं. यामुळे त्वचेचा नूर वाढतो, पचनक्रिया सुधारते आणि लठ्ठपणा कमी होतो.
ब्रश करण्याआधी तीळ किंवा खोबरेल तेल तोंडात घेऊन ५-१० मिनिटं तोंडात फिर्वणं म्हणजेच तेल पुलिंग. ही पद्धत तोंडातील जंतूंना नष्ट करतं, हिरड्यांचं आरोग्य सुधारते आणि संपूर्ण तोंडाच्या स्वच्छतेसाठी फायदेशीर ठरते. हा उपाय पायरिया, दुर्गंधी आणि दातांच्या सडण्यापासून वाचवतो.
सकाळी केलेला व्यायाम संपूर्ण दिवसासाठी ऊर्जा प्रदान करतो. योगासने, प्राणायाम किंवा फक्त १० सूर्यनमस्कारही शरीराला ताजेतवाने ठेवतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं, हृदय बळकट राहतं आणि मेंदूला ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होतो. व्यायामामुळे मानसिक तणावही कमी होतो.
कोमट पाणी पिऊन दिवसाची सुरुवात केल्यास पचनसंस्था उत्तम राहते. विशेषतः लिंबू आणि मधासोबत कोमट पाणी घेतल्यास शरीरातील चरबी वितळते आणि शरीर हलकं वाटतं. यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्याही कमी होतात.
वरील सवयींचा अवलंब केल्यास शरीराला फक्त बाह्य नव्हे तर अंतर्गत स्तरावरही फायदे होतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्वचेची चमक टिकून राहते, थकवा जाणवत नाही आणि मन प्रसन्न राहतं. हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा अनेक आजारांपासून संरक्षण मिळतं.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)