किस चक्की का आटा खाते हो ? आजारी न पडता दीर्घायुषी होणाऱ्यांच्या आरोग्याचे रहस्य आहे तरी काय ?

एका अमेरिकन पत्रकाराने पृथ्वीवर अशी पाच ठिकाणे शोधली आहेत जिथे लोक कोणत्याही दीर्घ आजाराशिवाय 100 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ जगतात. त्यांनी अशा लोकांच्या जेवणाविषयी माहिती गोळा केली.

किस चक्की का आटा खाते हो ? आजारी न पडता दीर्घायुषी होणाऱ्यांच्या आरोग्याचे रहस्य आहे तरी काय ?
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 1:25 PM

नवी दिल्ली : आपले आयुष्य निरोगी आणि दीर्घायुषी  (live longer) व्हावे अशी आपल्या सर्वांना इच्छा असते. शास्त्रज्ञांनीही यावर बरेच संशोधन देखील केले आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले की आपले सामाजिक संबंध, झोपेच्या सवयी (sleep), आनंदाची पातळी, वातावरण आणि उद्देशाची भावना यामध्ये दीर्घकाळ जगण्याचे रहस्य आहे. पण दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे आपले खाणेपिणे (food).

अमेरिकेचे नॅशनल जिओग्राफिक फेलो, पुरस्कार विजेते पत्रकार आणि माहितीपट निर्माते डॅन बुएटनर यांनी आहार आणि दीर्घायुष्य यावर बरेच संशोधन केले आहे. पृथ्वीचा ‘ब्लू झोन’ ओळखणारा पहिला व्यक्ती होण्याचे श्रेय ब्युटनर यांना जाते. ब्लू झोन ही पृथ्वीवरील पाच ठिकाणे आहेत जिथे लोक सर्वात जास्त, निरोगी आयुष्य जगतात. येथील लोक 100 वर्षे किंवा त्याहून अधिक जगतात आणि तेही कोणत्याही आजाराशिवाय.

2008 मध्ये, त्यांनी त्यांच्या The Blue Zones: 9 Lessons for Living Longer from the People who’ve Lived the Longest या बेस्टसेलिंग पुस्तकात त्यांचे निष्कर्ष प्रकाशित केले. इकारिया (ग्रीस), सार्डिनिया (इटली), ओकिनावा (जपान), लोमा लिंडा (कॅलिफोर्निया) आणि निकोया (कोस्टा रिका) ही त्यांनी ब्लू झोनमध्ये समाविष्ट केलेली ठिकाणे आहेत.

हे सुद्धा वाचा

डॅन बुएटनर यांनी त्यांच्या पॉडकास्टमध्ये सांगितले की, ‘जर तुम्ही विकसित जगात राहणारे सरासरी व्यक्ती असाल, तर तुम्ही कदाचित 14 वर्षांचे आयुर्मान गमावता आणि त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तुमचे स्वादिष्ट, उच्च प्रक्रिया केलेले अन्न. पण याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही.

तसेच डॅन ब्युटनर यांनी सांगितले की, आपण आपल्या जगात राहूनही ब्लू झोनच्या लोकांप्रमाणे स्वयंपाक करणे आणि खाणे शिकू शकतो. ब्लू झोनचे लोक खातात असे काही पदार्थ त्यांनी सांगितले आहेत. थोड्या प्रयत्नाने आपण या पदार्थांचा आहारात समावेश करू शकतो. आणि सर्वात रंजक गोष्ट म्हणजे ब्लू झोनमधील जवळजवळ सर्व लोक त्यांच्या पिण्यामध्ये चहा-कॉफी आणि वाइनचा समावेश करतात.

ते काय खातात ते जाणून घेऊया.

वनस्पतींपासून मिळणारे अन्न

ब्लू झोनमधील लोकांचे 95% अन्न वनस्पतींद्वारे मिळते. आपले बहुतेक अन्न वनस्पतींमधून येते. आपल्या आहारात अधिकाधिक वनस्पतींपासून मिळणाऱ्या उत्पादनांना प्राधान्य द्या. भरपूर बीन्स, हिरव्या भाज्या खा – विशेषतः पालक, रताळे, नट आणि बिया, संपूर्ण धान्य, हे खाल्ल्याने फायदाच होतो.

मांस आठवड्यातून केवळ दोनवेळा खावे

पाचपैकी चार ब्लू झोनमधील लोक मांस खातात. पण ते लोक फक्त सणासुदीच्या दिवशी साइड डिश म्हणून मांस खातात. जर तुम्हाला मांस खाण्याची आवड असेल तर आठवड्यातून दोनदा खआवे, त्यापेक्षा जास्त खाऊ नका. हे देखील लक्षात ठेवा की तुम्ही जे मांस खात आहात ते ताजे असावे, प्रक्रिया केलेले मांस नसावे.

रोज खाऊ शकता मासे

साधारणपणे प्रत्येक ब्लू झोनचे लोक दररोज थोड्या प्रमाणात मासे खातात. दीर्घायुष्यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात माशांचा समावेश करू शकता. अशा माशांचा आहारात समावेश करा ज्यामध्ये पाऱ्याचे प्रमाण नगण्य असेल.

गाईच्या दुधापासून बनलेली उत्पादने गरजेची नाहीत

निरोगी राहण्यासाठी आणि कॅल्शिअमचा पुरवठा करण्यासाठी आपल्याला अनेकदा गायीच्या दुधापासून बनवलेल्या गोष्टी खाण्यास सांगितले जाते. परंतु गायीचे दूध कोणत्याही ब्लू झोन आहाराचा महत्त्वपूर्ण भाग नाही. येथील लोक बकरी किंवा मेंढीच्या दुधापासून दही किंवा पनीर बनवतात आणि त्यांचा आहारात समावेश आहे. आपली पचनसंस्था गाईच्या दुग्धजन्य पदार्थांसाठी अनुकूल नाही हेही अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे. गाईच्या दुधाऐवजी आपण एक कप टोफू घेऊ शकतो, ते एक कप दुधाइतके कॅल्शिअम देते.

अंडी आठवड्यातून केवळ तीन खावीत

ब्लू झोनमधील रहिवासी सहसा आठवड्यातून तीनपेक्षा जास्त अंडी खात नाहीत. इथले लोक मांसासोबत साइड डिश म्हणून अंडी खातात किंवा संपूर्ण धान्यासोबत खातात. काही लोक त्यांच्या सूपमध्ये उकडलेले अंडे खातात तर काहीजण बीन्ससह तळलेले अंडे खातात. ब्लू झोनमधील काही लोक न्याहारीसाठी अंडी सेवन करतात.

साखरेचे प्रमाण कमी करावे

ब्लू झोनचे लोक कोणत्याही सण किंवा उत्सवादरम्यानच मिठाई खातात. जर तुम्हाला जास्त काळ जगायचे असेल तर अशा कोणत्याही उत्पादनाचे सेवन करू नका ज्याच्या पहिल्या पाच घटकांमध्ये साखर असेल. साखरेचे सेवन दररोज 100 कॅलरीजपर्यंत मर्यादित करा. ही साखर उष्मांक सुक्या मेव्यातूनही मिळत असेल तर उत्तम. दिवसात जास्तीत जास्त सात चमचे साखर असावी.

संपूर्ण धान्य खावे

आपले पूर्वज कोणतीही प्रक्रिया न केलेले संपूर्ण धान्य खात असतं. म्हणूनच ते क्वचितच आजारी पडायचे आणि दीर्घकाळ जगायचे. ब्ल्यू झोनचे लोकही हेच अन्न खातात. ते त्यांचे बहुतेक अन्न कच्चे, हलके शिजवलेले किंवा पावडर स्वरूपात खातात.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.