तंबाखू खाल्ल्याने नपुंसकतेचा धोका; गुटख्यापासून मुक्ती कशी मिळवाल?

| Updated on: Sep 04, 2021 | 7:21 AM

योग्य प्रमाणात मद्यसेवन केलं तर त्याचे अनेक फायदे होतात, असं तज्ज्ञ सांगतात. मात्र, गुटखा किंवा तंबाखू खाणं आरोग्यासाठी नुकसानकारकच असतं. (How To Stop Tobacco Chewing And These Are Simple Ways To Help You Resist)

तंबाखू खाल्ल्याने नपुंसकतेचा धोका; गुटख्यापासून मुक्ती कशी मिळवाल?
tobacco chewing
Follow us on

नवी दिल्ली: योग्य प्रमाणात मद्यसेवन केलं तर त्याचे अनेक फायदे होतात, असं तज्ज्ञ सांगतात. मात्र, गुटखा किंवा तंबाखू खाणं आरोग्यासाठी नुकसानकारकच असतं. गुटखा किंवा तंबाखू खाल्ल्यावर दातांना कीड लागत नाही, असं ग्रामीण भागातील लोक सांगतात. पण त्यात काही तथ्य नाही. गुटखा खाल्ल्याने माणसाचं शरीर कमकुवत होत जातं. गुटखा खाणाऱ्यांना अकाली वृद्धत्व येत असल्याचंही दिसून आलं आहे. (How To Stop Tobacco Chewing And These Are Simple Ways To Help You Resist)

गुटखा खाल्ल्याने आपण लवकरच वयस्क दिसू लागतो. चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात हे अनेकांना माहीत आहे. परंतु, तरीही ते गुटखा खायचं बंद करत नाहीत. त्यामुळे गुटख्यामुळे होणारं नुकसान आणि त्यापासून मुक्ती कशी मिळवायची यावर आज आपण चर्चा करणार आहोत.

गुटख्यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग

धूम्रपानामुळेच फुफ्फुसाचा कर्करोग होतो. स्मोकिंग करणाऱ्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होतो. तसेच जे लोक गुटखा खातात त्यांनाही फुफ्फुसाचा कर्करोग होतो. त्यामुळे धुम्रपान आणि तंबाखूचं सेवन टाळा.

यकृताच कर्करोग

यकृताच्या कर्करोगामुळे भारतात हजारो लोक जीव गमावतात. शुगरमुळे फॅटी लिव्हर होते. परंतु, गुटखा खाल्ल्याने यकृतात संक्रमण झाल्यास कोणत्याही क्षणी व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. कॅन्सर झाल्यानंतर हे संक्रमण वाढण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळेच तंबाखू, गुटख्याच्या सेवनावर बंदी आणण्याची नितांत गरज आहे.

इरेक्टाइल डिस्फंक्शन

इरेक्टाइल डिस्फंक्शन ही पुरुषांमध्ये निर्माण होणारी एक समस्या आहे. त्याला साधारण बोलीभाषेत नपुंसकता म्हटलं जातं. गुटखा किंवा तंबाखूचं सेवन केल्याने इरेक्टाइल डिस्फंक्शनचा धोका अधिकपटीने वाढतो. त्यामुळे पुरुषांच्या लैंगिक संबंधावर परिणाम होतो. त्यांची स्पर्म क्वॉलसिटी ऑफ लाईफही खराब होते. त्यामुळे वैवाहिक आयुष्य आनंदी आणि सुखी ठेवायचं असेल तर तात्काळ गुटखा किंवा तंबाखूजन्य गोष्टी खाणं टाळा.

तोंडाचा कर्करोग

तोंडाच्या कर्करोगाने केवळ पुरुषच नाही तर महिलाही त्रस्त आहेत. त्यामुळे तुमच्या बोलण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. तंबाखू खात असल्याने बोलताना अनेकांच्या तोंडातून थुंकी बाहेर पडत असते.

अचानक गुटखा खाने बंद करू नका

तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी असेल तर तुम्हाला लवकरात लवकर गुटखा सोडायचा आहे याची खूणगाठ मनात बांधून ठेवा. ही सवय सोडण्यासाठी सर्वात आधी तुम्ही तुमची वेळ ठरवून घ्या. कारण कोणत्याही नियोजनाशिवया तुम्ही कोणत्याही सवयींपासून मुक्त होऊ शकत नाही. त्यामुळे कोणत्या कोणत्यावेळी गुटखा सोडायचा आहे, हे तुम्ही आधी ठरवा. ही सवय अचानक सोडू नका. त्यामुळे तुम्हाला त्रास होईल. ही सवय आधी कमी करा. हळूहळून प्रमाण कमी करून नंतर कायमची सवय सोडा. त्यामुळे तुमची सवय सुटेल आणि त्रासही होणार नाही.

अशी सोडा सवय

काही लोक ऑफिसमध्ये काम करताना गुटखा, तंबाखूचं सेवन करतात, तर काही लोक मित्रांसोबत असताना गुटखा, तंबाखूचं सेवन करतात. कधी कधी तर तलफ नसतानाही केवळ समोरच्या व्यक्तीने ऑफर केली म्हणून गुटखा किंवा तंबाखूचं सेवन करतात. काही लोक तर चहा कॉफी घेता घेता गुटखा खातात. त्यामुळे अशा सवयींना अंकूश लावलाच पाहिजे. कोणी ऑफर केली तर त्याला नकार द्या किंवा तिथून निघून जा. अशा लोकांसोबत भेटणं टाळा. ज्या दुकानांमध्ये दर्शनी भागातच गुटखा, तंबाखू लावलेल्या असतात त्या दुकानांकडे फिरकूही नका. तुम्हाला गुटख्याची तलफ आल्यास बडिशेप किंवा इलायची चघळा म्हणजे तुमची गुटख्याची सवय सुटेल. (How To Stop Tobacco Chewing And These Are Simple Ways To Help You Resist)

 

संबंधित बातम्या:

बापरे! वाशिममध्ये बालकांना ‘मिस-सी’ आजाराची लागण; आतापर्यंत 30 पेक्षा अधिक बालके आजाराच्या विळख्यात

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प घट, सक्रिय रुग्णसंख्या 3.99 लाखांवर

Toothache Home Remedies : दातदुखीने त्रस्त असाल तर ‘हे’ खास घरगुती उपाय करून पाहा!

(How To Stop Tobacco Chewing And These Are Simple Ways To Help You Resist)