Headache in winter: हिवाळ्यातच वारंवार डोकेदुखी का होतेय? घरच्या घरी काय उपाय कराल?; वाचाल तर वाचाल

थंडीच्या ऋतूमध्ये काही लोकांना वारंवार डोकेदुखीचा त्रास होतो. यामागचे कारण काय व त्यापासून मुक्त होण्यासाठी घरगुती उपचार जाणून घेऊया.

Headache in winter: हिवाळ्यातच वारंवार डोकेदुखी का होतेय? घरच्या घरी काय उपाय कराल?; वाचाल तर वाचाल
| Updated on: Nov 21, 2022 | 1:59 PM

नवी दिल्ली – आजकाल डोकेदुखीची समस्या खूप कॉमन झाली आहे. त्यामागे शेकडो कारणं असू शकतात. कोणाचं कामाच्या ताणामुळे डोकं दुखतं, तर कोणाला डोळ्यांच्या त्रासामुळे डोकेदुखी सुरू होते. थंड हवामान हेदेखील डोकेदुखीचे कारण असू शकते. हिवाळा (winter) सुरू झाला की काही लोकांना डोकेदुखीचा त्रास सुरू होतो, त्यामुळे त्यांच्या दैनंदिन कामावरही परिणाम होतो. पण या समस्येवर घरच्या घरीही उपचार (home remedies for headache) करता येतात. मात्र ते करण्यापूर्वी यामागचे कारण (Cause of headache in winter) जाणून घेणे गरजेचे आहे.

हिवाळ्यात वारंवार डोकं दुखण्याचे कारण काय ?

काही लोकांना हिवाळ्यात डोकेदुखीचा जास्त त्रास होतो, असे दिसून आले आहे. याबाबतीत तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की थंडीच्या दिवसात डोक्यासह शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावू लागतात, त्यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होते. डोक्यामध्ये रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे डोकेदुखी सुरू होते. थंड वारा वाहू लागल्यानंतर असे होते. थंडीत डोकेदुखी वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे थंडीच्या दिवसात आपण पाणी कमी पितो. डिहायड्रेशनमुळेही डोकेदुखी उद्भवू शकते.

पुदीन्याच्या पानांचा करा वापर

जर तुम्ही हिवाळ्यात वारंवार झालेल्या डोकेदुखीमुळे त्रासला असाल तर पुदिन्याच्या पानांनी त्यावर उपचार करता येतात. पुदिना तेल डोकेदुखीसाठी प्रभावी मानले गेले आहे, त्याचप्रमाणे पुदिन्याच्या पानेही उपयुक्त ठरू शकतात. पुदिन्याच्या पानांमध्ये मेन्थॉल नावाचे ॲक्टिव्ह (सक्रिय) कंपाऊंड असते, जे डोकेदुखीवर उपचार करण्यास मदत करू शकते.

कसा करावा वापर ?
डोकेदुखीवर उपचार करण्यासाठी पुदिन्याची पाने वापरणे अगदी सोपे आहे.

– पुदिन्याची ताजी 5-6 पाने घेऊन ती स्वच्छ धुवावी.
– त्यानंतर ती मिक्सरमधून बारीक करून घ्यावीत.
– आता ती एका स्वच्छ कापडात घालून त्याचा रस गाळून घ्यावा.
– आता कापसाचे छोटे बोळे घेऊन पुदिन्याच्या पानांचा रस आपल्या कपाळावर नीट लावावा.
– थोड्या वेळाने तो रस पाण्याने स्वच्छ धुवून टाकावा.
– तुम्हाला वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल तर दिवसातून 2-3 वेळा हा रस कपाळावर लावावा.

डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे
मात्र तुम्हाला खूप वेदना जास्त असेल आणि घरगुती उपचारांच्या मदतीनेही बरे वाटत नसेल तर एकडा डॉक्टरांना दाखवावे. त्यांच्या सल्ल्यानुसार योग्य औषधे घ्यावीत.