दमलेल्या ‘बाळांची’ कहाणी; थकव्यासह निद्रानाशाची वाढती समस्या, वेळीच उचला ‘ही’ पावलं!

| Updated on: Dec 28, 2021 | 6:45 PM

शारीरिक थकवा, सांधेदुखी, झोपेची समस्या यासारख्या समस्या मॅग्नेशियमच्या कमतरतेचे निर्देशक आहेत. मानवी शरीरात पर्याप्त प्रमाणात आढळणाऱ्या सूक्ष्म-पोषणद्रव्यांत मॅग्नेशियमचा समावेश होतो. विविध संप्रेरकांच्या कार्यात मॅग्नेशियममुळे गती प्राप्त होते. हाडांच्या विकासात मॅग्नेशियम अत्यंत उपयुक्त ठरतो. त्यामुळे मुलांच्या शारीरिक वाढीमध्ये मॅग्नेशियम अत्यंत महत्वपूर्ण आहे. मॅग्नेशियमच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे मुलांच्या वाढीवर मोठा परिणाम होतो. मुलांच्या वाढीसाठी मॅग्नेशियमची आवश्यकता आणि स्त्रोत जाणून घेऊया.

दमलेल्या ‘बाळांची’ कहाणी; थकव्यासह निद्रानाशाची वाढती समस्या, वेळीच उचला ‘ही’ पावलं!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

मुंबई– बालकांच्या निकोप शारीरिक व मानसिक वाढीसाठी पोषणद्रव्यांची आवश्यकता असते. बालकांच्या शरीराला उर्जेचा पुरवठा होतो. त्यामुळे संतुलित पणे शारीरिक क्रिया पार पडतात. शरीराला आवश्यक ठरणाऱ्या पोषण घटकांमध्ये मॅग्नेशियमचा समावेश होतो. शारीरिक थकवा, सांधेदुखी, झोपेची समस्या यासारख्या समस्या मॅग्नेशियमच्या कमतरतेचे निर्देशक आहेत. मानवी शरीरात पर्याप्त प्रमाणात आढळणाऱ्या सूक्ष्म-पोषणद्रव्यांत मॅग्नेशियमचा समावेश होतो. विविध संप्रेरकांच्या कार्यात मॅग्नेशियममुळे गती प्राप्त होते. हाडांच्या विकासात मॅग्नेशियम अत्यंत उपयुक्त ठरतो. त्यामुळे मुलांच्या शारीरिक वाढीमध्ये मॅग्नेशियम अत्यंत महत्वपूर्ण आहे.

मॅग्नेशियमच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे मुलांच्या वाढीवर मोठा परिणाम होतो. मुलांच्या वाढीसाठी मॅग्नेशियमची आवश्यकता आणि स्त्रोत जाणून घेऊया-

वयोगटानुसार मॅग्नेशियमची आवश्यकता पुढीलप्रमाणे:

o 1-3 वर्षे (80 मिलीग्रॅम/प्रति दिवस)
o 4-8 वर्षे (130 मिलीग्रॅम/प्रति दिवस)
o 9-13 वर्षे(240 मिलीग्रॅम/प्रति दिवस)
o 14-18 वर्षे (मुलांसाठी- 410, मुलींसाठी 360 मिलीग्रॅम/प्रति दिवस)

मॅग्नेशियमची आवश्यकता

शरीराच्या विविध कार्यामध्ये सहाय्यभूत ठरणारा मॅग्नेशियम महत्वपूर्ण घटक आहे. पेशींमध्ये चेतना, रक्तातील साखेरेचे नियंत्रण, प्रथिनांची निर्मिती, रक्तदाबावर नियंत्रण, उर्जेचा पुरवठा, हाडांना मजबूती देते, बालक आरोग्याच्या अभ्यास करणाऱ्या संस्थेने कॅल्शियम प्रमाणेच शरीराला मॅग्नेशियमची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

मॅग्नेशियमचे स्त्रोत

बदामात मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात उपलब्ध असते.मुलांना बदाम आणि दूध उपलब्ध करुन दिल्यास मॅग्नेशियमचा आवश्यक प्रमाणात शरीराला नक्कीच पुरवठा होईल.

कुणापासून किती मॅग्नेशियम:

o एक केळी-15%
o एक बटाटा-21%
o 28 ग्रॅम शेंगदाणे-12%
o एक कप सोया मिल्क-15%
o गव्हाची दोन बिस्कीटे-15%

भाजलेल्या काजूमध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नशियम असतात. मात्र, तेलामध्ये तळलेले काजू मुलांना खाण्यास देऊ नये. त्यामध्ये अधिक प्रमाणात फॅट असल्यामुळे शरीराला अपाय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.