कमी वयात हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण का वाढलंय? वेळीच ओळखा लक्षणं अन् टाळा धोका!

अभिनेता विकास सेठीचं वयाच्या 48 व्या वर्षी कार्डिॲक अरेस्टने निधन झालं. कमी वयात हार्ट अटॅक, कार्डिॲक अरेस्टच्या अनेक घटना याआधीही पहायला मिळाल्या आहेत. मात्र हे कशामुळे होतंय, त्याची लक्षणं काय आहेत, यांविषयीची सविस्तर माहिती या लेखातून जाणून घेऊयात..

कमी वयात हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण का वाढलंय? वेळीच ओळखा लक्षणं अन् टाळा धोका!
कमी वयात हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण का वाढलंय?
Image Credit source: Tv9
| Updated on: Sep 13, 2024 | 12:53 PM

‘क्योंकी सास भी कभी बहु थी’, ‘कसौटी जिंदगी की’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता विकास सेठी याचं 8 सप्टेंबर रोजी कार्डिॲक अरेस्टने निधन झालं. वयाच्या 48 व्या वर्षी विकासने आपले प्राण गमावले. याआधी प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचंही वयाच्या 40 व्या वर्षी हार्ट अटॅकमुळे निधन झालं होतं. आता विकासच्या निधनानंतर पुन्हा एकदा कमी वयात कार्डिॲक अरेस्ट आणि हार्ट अटॅक येणं या चिंतेच्या बाबीकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदेला गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हृदयविकाराचा झटका आला होता. त्याच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली होती. श्रेयससुद्धा 48 वर्षांचाच आहे. आपल्या फिटनेसबद्दल जागरूक असणारी अभिनेत्री सुष्मिता सेनला गेल्या वर्षी जेव्हा हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. माझ्या आर्टरीमध्ये 95 टक्के ब्लॉकेज होतं, असं सुष्मिताने सांगितलं होतं. तिच्यावरही अँजियोप्लास्टी झाली आणि स्टेंट लागले. सुष्मिता सेनसुद्धा 48 वर्षांची आहे. नियमित व्यायाम करणारे, डाएट पाळणारे, खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल सजग राहणारेसुद्धा हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडणं ही अत्यंत चिंताजनक बाब...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा