India Covid Cases: 7 महिन्यानंतर उच्चांक मोडला, देशातील रुग्णवाढ लाखांच्या पार, काय सांगते आकडेवारी?

गुरुवारी कोरोनाचे देशभरात तब्बल 1 लाख पेशंट आढळून आले. बुधवारच्या तुलनेतील ही आकडेवारी 28 टक्क्यांनी जास्त आहे. भारतात जवळपास सात महिन्यानंतर एवढी रुग्णवाढ दिसून आली आहे.

India Covid Cases: 7 महिन्यानंतर उच्चांक मोडला, देशातील रुग्णवाढ लाखांच्या पार, काय सांगते आकडेवारी?
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jan 07, 2022 | 12:29 PM

नवी दिल्लीः देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येचा मागील आठच दिवसात मोठा विस्फोट झालेला पहायला मिळतोय. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय स्तरापर्यंत खबरदारी घेतली जात असतानाही रुग्णवाढीचा वेग देशाला धडकी भरवणारा आहे. गुरुवारी कोरोनाचे देशभरात तब्बल 1 लाख पेशंट आढळून आले. बुधवारच्या तुलनेतील ही आकडेवारी 28 टक्क्यांनी जास्त आहे. भारतात जवळपास सात महिन्यानंतर एवढी रुग्णवाढ दिसून आली आहे. सात महिन्यांपूर्वी म्हणजे 6 जूनला भारतात 1 लाखाहून अधिक रुग्ण आढळले होते. ही वाढ फक्त मागील आठ दिवसातच झाली आहे. आठ दिवसांपूर्वी भारतातील कोरोना रुग्णांची संख्या फक्त 10 हजार एवढी होती, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

काय आहे आकडेवारी?

– देशात बुधवारी 1 लाख 17 हजार 100 रुग्ण आढळले.
– आतापर्यंत देशात 3 कोटी 52 लाख 26 हजार 386 कोरोनाबाधित रुग्ण आढळले.
– सक्रीय रुग्णांची संख्या देशात 3 लाख 71 हजार एवढी आहे.
– भारतात मागील 24 तासात 302 रुग्णांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत कोरोनामुळे 4 लाख 83 हजार लोकांचा मृत्यू झाला.
– भारतातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 97.57 टक्के एवढा आहे.

वेगानं फैलाव होणाऱ्या राज्यांची स्थिती काय?

महाराष्ट्रात- 36 हजार 235
पश्चिम बंगाल- 15 हजार 421
दिल्ली- 15 हजार 97,
तमिळनाडू- 6 हजार 983
कर्नाटकात 5 हजार 31 रुग्ण आढळले.
महाराष्ट्रातील आकडेवारी चिंताजनक असून एकूण रुग्णसंख्येपैकी 30.97 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत.

इतर बातम्या-

Binge Watch | ‘पुष्पा’ ते ‘द टेंडर बार’ पर्यंत, पाहा या आठवड्यात OTT वर काय काय प्रदर्शित होणार?

Sphatik Mala | स्फटिक माळेचे जादूई उपयोग तुम्हाला माहीत आहेत का ? आजच वापरुन पाहा