High Blood Pressure : या सवयींमुळे वाढतो हाय बीपीचा धोका, आजच करा बदल

| Updated on: Jul 24, 2023 | 5:39 PM

बदलती लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे अनेक लोकांना गंभीर आजार होतात. त्यापैकीच एक म्हणजे ब्लड प्रेशरचा त्रास.

High Blood Pressure :  या सवयींमुळे वाढतो हाय बीपीचा धोका, आजच करा बदल
Image Credit source: freepik
Follow us on

नवी दिल्ली | 24 जुलै 2023 : आजकालच्या धावपळीच्या जगात, बहुतांश लोकांना उच्च रक्तदाबाची म्हणजेच हाय ब्लड प्रेशरची (High Blood Pressure) समस्या सतावत असते. पण अनेक लोकांना या समस्येची किंवा त्याच्या अस्तित्वाची जाणीवही नसते, म्हणून या आजाराला सायलेंट किलर म्हणतात. ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवले नाही तर स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका येण्याचा किंवा किडनी निकामी होण्याचा धोका असतो.

असे असले तरी हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवणे सहज शक्य आहे. जर एखाद्या व्यक्तीचे ब्लड प्रेशर 140/90 mmHg किंवा त्याहून अधिक असेल तर त्याला हाय बीपी म्हणजेच उच्च रक्तदाब असे म्हणतात. आज देशातील तीनपैकी एक व्यक्ती उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहे. काही कारणे किंवा सवयींमुळे उच्च रक्तदाबाचा त्रास वाढू शकतो. ती कोणती हे जाणून घेऊया.

एकटेपणा

आजच्या युगात, बहुतेक लोक सोशल मीडियावर बिझी असततात किंवा वीकेंडला देखील काम करतात. त्यामुळे त्यांच बाहेर पडणं, लोकांना भेटणं बंद होतो. परिणामी एकटेपणाही वाढत आहे. बहुतेक लोक भेटण्याऐवजी ऑनलाइनच गप्पा मारणं पसंत करतात. पण तणाव कमी करण्यासाठी आणि इतरांचे दडपण कमी करण्यासाठी वीकेंडला मित्र किंवा नातेवाईकांसोबत वेळ घालवणे आवश्यक आहे. यामुळे तुमचे मन फ्रेश राहते आणि तणाव कमी होतो. जास्त काळ एकटे राहिल्याने नैराश्य किंवा डिप्रेशन येते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्याही उद्भवू शकते.

बराच काळ लघवी रोखून ठेवणे

वारंवार बराच काल लघवी रोखून ठेवल्याने ब्लॅडरचे स्नायू खेचले जातात आणि कमकुवत होतात. ज्यामुळे दीर्घकाळानंतर हाय ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो.

सर्दी- खोकल्याचे औषध

बऱ्याच काळापर्यंत सर्दी- खोकल्याच्या औषधाचा वापर किंवा उपयोग केल्यास रक्तवाहिन्या पातळ होता. ज्यामुळे हाय ब्लड प्रेशरची समस्या उद्भवते.

डिहायड्रेशन

डिहायड्रेशन, म्हणजेच शरीरात जर पाण्याची कमतरता असेल तर रक्तवाहिन्या कडक होऊ शकतात. हेही हाय ब्लड प्रेशरसाठी कारणीभूत ठरू शकते. त्यासाठी दिवसभरात पुरेसे पाणी किंवा द्रव पदार्थ प्यायले पाहिजेत.

पेनकिलर

बहुतांश लोक थोडासा त्रास झाला, बरं नसलं, काही दुखलं खुपलं तरीही लगेचच पेनकिलर घेतात, पण त्याचा आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. झटपट आराम देणारी ही औषधे आरोग्यासाठी हानिकारक आहेत. त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)