AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya : T20 World Cup 2026 जिंकल्यानंतर हार्दिक पंड्याला पुण्याच्या वकिलाने दिला मोठा झटका

Hardik Pandya : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाने रविवारी टी20 वर्ल्ड कप सलग दुसऱ्यांदा जिंकला. भारताने फायनलमध्ये न्यूझीलंडला 96 धावांनी पराभूत केलं. या वर्ल्ड कप विजयानंतर आता हार्दिक पंड्या अडचणीत आला आहे.

Hardik Pandya : T20 World Cup 2026 जिंकल्यानंतर हार्दिक पंड्याला पुण्याच्या वकिलाने दिला मोठा झटका
Hardik Pandya Image Credit source: PTI
| Updated on: Mar 12, 2026 | 10:01 AM
Share

टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकल्याने सगळ्या देशात उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे. अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडला हरवून रेकॉर्ड तिसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली. या विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी जोरदार सेलीब्रेशन केलं. आता हे सर्व प्लेयर आपपाल्या घरी पोहोचले आहेत. तिथे त्यांचं जोरदार स्वागत होतय. पण किताब जिंकल्यानंतर तीन दिवसातच टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या अडचणीत आलाय. पुण्याच्या एका वकिलाने हार्दिकवर राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करत पोलीसात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक पंड्या विरोधात पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आहे. स्थानिक वकिल वाजिद खान यांनी हार्दिक विरोधात तक्रार नोंदवली आहे. हार्दिक पंड्याने मॅच संपल्यानंतर सेलिब्रेशन करताना राष्ट्रीय ध्वज तिरंग्याचा अपमान केला असा आरोप केला आहे. हार्दिकने राष्ट्रीय ध्वजाला आपल्या शरीरभोवती गुंडाळलं होतं. त्याच्यासोबत त्याची सहकारी मैत्रीण सुद्धा स्टेजवर झोपलेली असं तक्रारीत वकिलाने म्हटलं आहे.

पोलिसांनी सध्या तरी FIR नोंदवलेला नाही

तक्रारदाराने हार्दिक पंड्या विरोधात FIR नोंदवण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान करणं प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे. या प्रकरणात कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी सध्या तरी FIR नोंदवलेला नाही. पण तक्रार मिळाल्याची पुष्टी केली आहे. या प्रकरणात चौकशी करणार असल्याचं म्हटलं आहे.

त्यांनी परस्परांना मिठी मारली

फायनल मॅच संपल्यानंतरची ही घटना आहे. त्यावेळी पुरस्कारांचं वितरण झालेलं होतं. सर्व खेळाडू आपपाल्या कुटुंबांसह मैदानावर विजयाचं सेलिब्रेशन करत होते. हार्दिकसोबत निळ्या ड्रेसमध्ये त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा होती. तिच्यासोबतच तो पूर्णवेळ मैदानात फिरत होता. त्यांनी परस्परांना मिठी मारली. किस केलं. सहकारी खेळाडूंसोबत डान्सही केला. या दरम्यान हार्दिक आणि माहिका ट्रॉफी असलेल्या पोडियमवर काहीवेळ एकत्र बसलेले. त्यावेळी हार्दिकने आपल्या शरीराभोवती तिरंगा गुंडाळलेला. त्यानंतर काही सेकंद दोघे पोडियमवर झोपले. त्यावरुन आता तक्रार नोंदवण्यात आली आहे.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून ठिकठिकाणी ध्वजारोहण करत....
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून ठिकठिकाणी ध्वजारोहण करत.....
एअरबॅगमुळे भाजप खासदार सावरांचा थोडक्यात जीव वाचला, घोडबंदर रोडवर भीषण
एअरबॅगमुळे भाजप खासदार सावरांचा थोडक्यात जीव वाचला, घोडबंदर रोडवर भीषण.
नंदनवनवर भेट, राजकारणात खळबळ, परांजपे शिंदे गटाच्या वाटेवर?
नंदनवनवर भेट, राजकारणात खळबळ, परांजपे शिंदे गटाच्या वाटेवर?.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हुतात्मा स्मारकास अभिवादन
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हुतात्मा स्मारकास अभिवादन.