AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणमध्ये हाहाकार! थेट धक्कादायक अहवाल पुढे, अमेरिकेसोबतच्या युद्धात परराष्ट्र मंत्र्यांना..

इराण आणि अमेरिका युद्धाला एक महिन्यापेक्षा अधिक काळ झाला. मात्र, युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामध्येच आता खळबळ उडवणारी बातमी पुढे येत आहे. इराणीमध्ये कलह सुरू झाल्याचे बघायला मिळत आहे.

इराणमध्ये हाहाकार! थेट धक्कादायक अहवाल पुढे, अमेरिकेसोबतच्या युद्धात परराष्ट्र मंत्र्यांना..
Iranian Foreign Minister Abbas Araghchi
| Updated on: May 01, 2026 | 3:38 PM
Share

अमेरिकेसोबत सुरू असलेल्या तणावात इराणमधून धक्कादायक बातमी पुढे येत आहे. इराणमध्ये युद्धादरम्यान मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय. नुकताच मिळालेल्या अहवालानुसार, इराणी सरकारमध्ये मोठी फूट पडली.  इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांना त्यांच्या पदावरून हटवण्याची तयारी सुरू केली आहे. हा मोठा धक्का म्हणावा लागेल. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान दाैऱ्यावर होते. पाकिस्तानमधून ते थेट रशियाला पोहोचले. अब्बास अराघची यांच्याकडून युद्ध रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सध्याच्या घडीला इराणमध्ये फूट पडल्याचे बघायला मिळत आहे. मात्र, या रिपोर्टवर इराणी सरकारकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

ब्रिटिश माध्यम संस्था इराण इंटरनॅशनलच्या अहवालानुसार, अराघची यांच्यावर काही गंभीर आरोप करण्यात आली. त्यांच्याविरोधात एक गट सक्रिय झाला. यासोबतच अराघची हे राष्ट्रपतींच्या कार्यालयाला उत्तरदायी न राहता परराष्ट्र मंत्रालय स्वतंत्रपणे चालवत आहेत. परराष्ट्र मंत्री अधिकृत मंत्रिमंडळाच्या धोरणांऐवजी रिव्होल्यूशनरी गार्ड्सच्या निर्देशांचे पालन करत आहेत, असाही आरोप आहे.

याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर अराघची यांची खुर्ची जाण्याची मोठी शक्यता आहे. अध्यक्ष पेझेश्कियान यांचे म्हणणे आहे की, महत्त्वाच्या राजनैतिक चर्चांमध्ये परराष्ट्र मंत्री अराघची यांनी सरकारऐवजी लष्कराची आयआरजीसीची बाजू घेतली आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर अराघची यांना पदावरून हटवले जाईल. सूत्रांच्या दाव्यानुसार, अराघची हे रिव्होल्यूशनरी गार्डचे कमांडर अहमद वाहिदी यांचे सहकारी म्हणून काम करत आहेत. अध्यक्षांच्या नकळत त्यांच्या रणनीतींची अंमलबजावणी करत आहेत. ज्यामुळे त्यांचे पद जाण्याची शक्यता आहे.

अमेरिकेसोबत मोठे युद्ध सुरू असतानाच इराणमध्ये दोन गट पडल्याचे बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अराघची युद्धविरामासाठी इराणची बाजू मांडत आहे. मात्र, आता थेट त्यांच्या भूमिकेवरच संशय घेतला जात आहे. या वादावर इराण सरकारने काहीही भाष्य केले नाही. मात्र, इराणमध्ये मोठा राजकीय भूकंप कधीही होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

Follow Us
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच