AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण अमेरिका युद्धात भारत करणार मध्यस्थी? पाकिस्तानला नारळ देताच थेट भारताला..

इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. यादरम्यानच आता इराणमधून भारताला फोन आला. सध्याच्या परिस्थितीवर चर्चा झाली. पाकिस्तानला युद्धाच्या मध्यस्थीमधून बाहेरचा रस्ता दाखवल्याचे कळत आहे.

इराण अमेरिका युद्धात भारत करणार मध्यस्थी? पाकिस्तानला नारळ देताच थेट भारताला..
Foreign Minister Seyed Abbas
| Updated on: Apr 30, 2026 | 8:21 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात जग वैतागले आहे. दोन महिने झाले तरीही युद्ध काही थांबत नाही. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धसंधीची घोषणा करण्यात आली. पाकिस्तान युद्धात मध्यस्थी करत आहे. एकच बैठक आतापर्यंत घेण्यात पाकिस्तानला यश आले. उलट बैठकीनंतर तणाव कमी व्हायचा तर तणाव अधिक वाढल्याचे बघायला मिळाले. जागतिक बाजार या युद्धामुळे संकटात आहे. कच्च्या तेलाच्या किमती सतत वाढत आहेत. यादरम्यानच आता अमेरिकेने पाकिस्तानला दणका दिला. इराणकडून पाकिस्तानच्या मध्यस्थीवर संशय व्यक्त केला जात आहे. भारत आणि इराणचे संबंध चांगले आहेत. ज्यावेळी जगासाठी होर्मुज खाडी बंद होती, त्यावेळी होर्मुज खाडीतून भारतीय जहाज सोडले जात होते. या युद्धात भारताने शांततेची भूमिका घेतली आहे. पाकिस्तान युद्धात मध्यस्थी करण्यासाठी सरळ तोंडावर पडल्याचे बघायला मिळत आहे.

यादरम्यानच आता मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची आणि भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांच्यात फोनवरून चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी होर्मुज खाडीतील परिस्थितीवर चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. होर्मुज खाडी अत्यंत महत्वाची आहे. कच्च्या तेलासाठी हा महत्वाचा सागरी मार्ग आहे. अराघची यांनी सध्याच्या काही मुद्द्यांवरही चर्चा केली.

अराघची यांच्या म्हणण्यांनुसार जयशंकर यांच्यासोबत सध्याच्या परिस्थिवीर चर्चा केली. दोन्ही देशांचे संबंध चांगले आहेत. नक्की काय चर्चा सुरू आहे, याची माहितीही इराणकडून भारताला देण्यात आली. इराण अमेरिकेसोबत युद्ध थांबवण्याकरिता चर्चा करत असताना भारतालाही विश्वासात घेत आहे. पाकिस्तानच्या मध्यस्थीला अपयश मिळाल्यानंतर इराण आणि अमेरिका आता फोनच्या माध्यमातून थेट एकमेकांसोबत संवाद साधणार आहेत.

विशेष म्हणजे हा फोन अशावेळी आला, ज्यावेळी पाकिस्तानला मध्यस्थीतून दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय दोन्ही देश थेटपणे संवाद साधणार आहेत. होर्मुज खाडीत भारतीय जहाजावर झालेल्या गोळीबारानंतर भारत आक्रमक भूमिकेत होता. त्यावेळी थेट इराणसोबत संवाद साधण्यात आला. अजूनही भारतीय जहाज होर्मुज खाडीत उभे आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी सतत इराणच्या सरकारच्या संपर्कात भारत सरकार आहे.

Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...