AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shakib Al Hasan : शेख हसीना यांच्या भाषणानंतर बांग्लादेशमध्ये मोठा राडा, क्रिकेटर शाकिब अल हसनच्या घरावर पेट्रोल बॉम्बने हल्ला

Shakib Al Hasan : बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या पत्रकार परिषदेनंतर बांग्लादेशमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. माजी कर्णधाराच्या घरावर पेट्रोल बॉम्बने हल्ला

Shakib Al Hasan : शेख हसीना यांच्या भाषणानंतर बांग्लादेशमध्ये मोठा राडा, क्रिकेटर शाकिब अल हसनच्या घरावर पेट्रोल बॉम्बने हल्ला
sheikh hasina-shakib al hasan
| Updated on: Aug 06, 2026 | 7:23 AM
Share

बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये वर्चुअली सहभागी होणं, बांग्लादेश क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराला चांगलचं महाग पडलं आहे. शेख हसीना यांच्या पत्रकार परिषदेनंतर काही तासांनी शाकिब अल हसन याच्या वडिलोपार्जित घरावर पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला. बुधवारी रात्री ही घटना घडली. शाकिब अल हसन बांग्लादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अवामी लीग पक्षाचा माजी खासदार आहे. मागुरा शहरातील केशवमोर भागातील शाकिब अल हसनच्या वडिलोपार्जित घरावर हा हल्ला झाला. घरात तोड-फोडही करण्यात आली. काल दिल्लीच्या फॉरेन कॉरेस्पोंडेंट्स क्लबमध्ये शेख हसीना यांची पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी शाकिब अल हसन वर्चुअली सहभागी झाला होता. पत्रकार परिषदेनंतर काहीवेळाने शाकिबच्या घरावर हल्ला झाला.

बांग्लादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने शेख हसीना यांच्या या पत्रकार परिषदेवर नाराजी व्यक्त केली. पत्रकार परिषदेआधी BNP, इस्लामी जमात आणि NCP यांनी नॅशनल मीडियाला खुलेआम धमकी दिली होती. प्रेस कॉन्फ्रेंसच्या बातम्या छापल्या तर ते कोर्टात जातील व खटला दाखल करतील. अवामी लीगने या हिंसाचारावर प्रतिक्रिया दिली आहे. “ही विचारपूर्वक केलेली कृती आहे. अवामी लीगच्या कार्यकर्त्यांविरुद्ध सुरु असलेल्या नरसंहार अभियानाचा एक पुरावा आहे” बुधवारी शेख हसीना सरकारच्या सत्तापालटाला दोन वर्ष पूर्ण झाली. ‘मी डिसेंबर महिन्यात बांग्लादेशमध्ये परत जाणार’ असं शेख हसीना यांनी या पत्रकार परिषदेत जाहीर केलं आहे.बांग्लादेशात परत लोकशाही आणण्यासाठी अटक किंवा मृत्यू दोघांचा सामना करण्यासाठी त्या तयार आहेत.

मला माहितीय तिथे माझ्यासोबत काय होऊ शकतं

“माझं बांग्लादेशात परतणं हे फक्त सत्तेसाठी नाहीय, तर बांग्लादेशला पुन्हा विकास, धर्मनिरपेक्षता आणि समृद्धीच्या मार्गावर आणण्यासाठी मी परतणार आहे” असं शेख हसीना म्हणाल्या. शेख हसीना आता 78 वर्षांच्या आहेत. परतल्यानंतर तिथे कुठल्या परिस्थितीचा सामना करावा लागेल त्याची शेख हसीना यांना कल्पना आहे. “मला माहितीय, ते मला जेलमध्ये टाकू शकतात किंवा मारु शकतात. मला आपल्या लोकांमध्ये रहायचय म्हणून मी परत जाणार आहे. मी परतण्याचा निर्णय घेतलाय आणि मी बांग्लादेशात जाणार” असं शेख हसीना म्हणाल्या.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं