Health Tips : ‘आंब्याची पाने’ अनेक रोगांवर ठरते रामबाण उपाय; बीपी नियंत्रणापासून, केस वाढीसाठी आहे उपयोगी.. जाणून घ्या, आंब्याच्या पानांचे फायदे!

| Updated on: Jun 12, 2022 | 9:59 PM

हिंदू धर्मातील अनेक सण उत्सवात आंब्याच्या पानांना विशेष महत्व आहे. दिवाळी, दसरा सणांना तर, घराला लावण्यात येणाऱया तोरणामध्ये या पानांचा उपयोग केला जातो. परंतु, आंब्याच्या पानांचा या व्यतिरीक्तही अनेक प्रकारे उपयोग होतो.

Health Tips : ‘आंब्याची पाने’ अनेक रोगांवर ठरते रामबाण उपाय; बीपी नियंत्रणापासून, केस वाढीसाठी आहे उपयोगी.. जाणून घ्या, आंब्याच्या पानांचे फायदे!
‘आंब्याची पाने’ अनेक रोगांवर ठरते रामबाण उपाय; बीपी नियंत्रणापासून, केस वाढीसाठी आहे उपयोगी.. जाणून घ्या, आंब्याच्या पानांचे फायदे!
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. उन्हाळ्यात आंबा मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. या हंगामात तुम्ही अनेक प्रकारचे आंबे खाऊ शकता. हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. पण, तुम्हाला माहित आहे का? की आंब्याची पाने आरोग्यासाठी देखील खुप फायदेशीर आहेत. या पानांमध्ये औषधी गुणधर्म (Medicinal properties) आहेत. त्यात अनेक पोषक घटक असतात. आंब्याच्या पानात क, ब आणि अ जीवनसत्त्वे असतात. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. हे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर मात (Overcome problems) करण्यास मदत करते. बहुतांश वेळी आंब्याची पाने (Mango leaves) पूजेत वापरली जातात. परंतु, त्याचे आनेक फायदे असून, आरोग्यासाठीही त्याचा उपयोग करता येतो. जाणून घेऊया आंब्याच्या पानांचे फायदे.

मधुमेहासाठी फायदेशीर

मधुमेहाच्या उपचारात आंब्याच्या पानांचा वापर केला जातो. या पानांमध्ये अँथोसायनिडिन नावाचे टॅनिन असतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही पाने खूप फायदेशीर आहेत. यासाठी आंब्याची पाने वाळवून पावडर बनवा. या पावडरचे नियमित सेवन करा. तसेच आंब्याची पाने पाण्यात उकळा. ही पाने रात्रभर अशीच राहू द्या. ही पाने गाळून सकाळी रिकाम्या पोटी प्या. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना फायदा होऊन, शरीरातील शुगर कंट्रोल राहण्यास मदत होईल.

किडनी स्टोनसाठी प्रभावी

किडनी स्टोनपासून मुक्ती मिळवण्यासाठीही आंब्याची पाने खूप प्रभावी आहेत. यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा आंब्याच्या पानांची पावडर टाका. रात्रभर ते पाणी तसेच राहू द्या. हे पाणी सकाळी प्या. हे पाणी लघवीद्वारे शरीरातील स्टोन काढून टाकण्यास मदत करते.

बीपी नियंत्रित करते

आंब्याची पाने ही उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे काम करतात. यासाठी आंब्याची पाने पाण्यात उकळून हे पाणी प्या. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होईल.

पोटासाठी फायदेशीर

आंब्याची पाने पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करतात. यासाठी आंब्याची पाने पाण्यात भिजवून रात्रभर ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्याचे हे पाणी काम करते.

केसांच्या वाढीस मदत करते

आंब्याच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. ते केसांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. ते केसांच्या वाढीस मदत करतात. ते केस गळणे थांबवतात. त्यामुळे केसांसाठीही आंब्याची पाने खूप फायदेशीर आहेत.