Health : कमी झोपल्याने त्रास होतोच पण जास्त झोपल्यानेही होतो हा गंभीर आजार, जाणून घ्या

| Updated on: Jul 20, 2023 | 11:20 PM

फक्त पुरेशी झोप न झाल्यामुळेच आजार निर्माण होतात असं नसून जास्त वेळ झोपल्यानंतरही अनेक आजारांचा धोका निर्माण होतो. होय, हे अगदी खरं आहे. तर आता आपण जास्त झोपल्यानंतरचे परिणाम जाणून घेणार आहोत.

Health : कमी झोपल्याने त्रास होतोच पण जास्त झोपल्यानेही होतो हा गंभीर आजार, जाणून घ्या
Good Sleep
Follow us on

डॉक्टर नेहमी प्रत्येकाला पुरेशी झोप घ्यायला सांगतात. तसंच प्रत्येक व्यक्तीने सात ते आठ तास झोप घेणं गरजेचं आहे. कारण जर पुरेशी झोप झाली नाही तर लोकांना अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. यासोबतच काही लोकांना खूप जास्त वेळ झोपायची सवय असते. पण तुम्हाला माहितीये का की फक्त पुरेशी झोप न झाल्यामुळेच आजार निर्माण होतात असं नसून जास्त वेळ झोपल्यानंतरही अनेक आजारांचा धोका निर्माण होतो. होय, हे अगदी खरं आहे. तर आता आपण जास्त झोपल्यानंतरचे परिणाम जाणून घेणार आहोत.

एका संशोधनानुसार, जास्त झोपल्यामुळे लोकांमध्ये नैराश्य निर्माण होते. तसंच शरीराची जास्त हालचाल होत नाही, शरीर आळशी बनून जाते. त्यामुळे अनेक शारीरिक समस्यांचा सामना लोकांना करावा लागतो.

जे लोक 9 तासापेक्षा जास्त वेळ झोपतात त्यांना डायबिटीस होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. तसेच जास्त वेळ झोपल्यामुळे आपल्या पचनसंस्थेवर परिणाम होतो. तर शरीराची जास्त हालचाल होत नसल्यामुळे लठ्ठपणाचीही समस्या निर्माण होते, आपलं वजन झपाट्याने वाढते. सोबतच बद्धकोष्ठता, पचनक्रियेशी संबंधित आजारही निर्माण होतात. त्यामुळे जास्त किंवा कमी झोप न घेता 7 ते 8 तास एवढी पुरेशी झोप घ्या.

जर तुम्हाला या समस्यांचा सामना करायचा नसेल तर पुरेशी झोप घ्या. योग्य आहार घ्या, व्यायाम करा. यामुळे दिवसभर तुम्हाला निरोगी आणि फ्रेश वाटेल. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आवश्यक तेवढीच झोप घ्या. यामुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही. तसंच तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल. त्यामुळे प्रत्येकाने पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे.