AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिगारेटचे व्यसन असणाऱ्यांसाठी अत्यंत धोक्याची घंटा, दृष्टी जाण्याचाही धोका, वाचा संशोधन काय म्हणते!

व्यसन (Addiction) कोणतेही असो, ते आरोग्यासाठी धोकादायकच असते. बरेच लोक टेन्शन आले की, लगेचच हातामध्ये सिगारेट घेतात आणि ओढत बसतात. मग अशावेळी एकपेक्षाही अधिक सिगारेट ओढल्या जातात. जवळपास सर्वांनाच माहिती आहे की, धुम्रपान करणे आरोग्यासाठी (Health) अत्यंत घातक आहे.

सिगारेटचे व्यसन असणाऱ्यांसाठी अत्यंत धोक्याची घंटा, दृष्टी जाण्याचाही धोका, वाचा संशोधन काय म्हणते!
सिगारेट ओढणे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 04, 2022 | 4:22 PM
Share

मुंबई : व्यसन (Addiction) कोणतेही असो, ते आरोग्यासाठी धोकादायकच असते. बरेच लोक टेन्शन आले की, लगेचच हातामध्ये सिगारेट घेतात आणि ओढत बसतात. मग अशावेळी एकपेक्षाही अधिक सिगारेट ओढल्या जातात. जवळपास सर्वांनाच माहिती आहे की, धुम्रपान करणे आरोग्यासाठी (Health) अत्यंत घातक आहे. तसेच धुम्रपानसंदर्भातील अनेक जाहिराती या पेपर आणि टिव्हीवरती सतत सुरू असतात. मात्र, शरीरासाठी धुम्रपान करणे धोकादायक (Dangerous) आहे. यामुळे गंभीर प्रकारचे अनेक आजार होऊ शकतात, हे माहिती असून सुध्दा अनेक लोक दिवसातून 3-4 वेळा सिगारेट ओढतातच.

अमेरिकेच्या संशोधनातून धक्कादायक माहिती पुढे

नुकताच अमेरिकेमधील एका अभ्यासातून एक धक्कादायक आणि सिगारेट ओढणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा समोर आली आहे. अमेरिकेमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासातून अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या आहेत. विशेष म्हणजे हे वाचल्यानंतर तुमच्या हातामध्ये असलेली सिगारेट नक्कीच खाली पडेल. यावर कॅलिफोर्निया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे. सिगारेट आणि यामुळे होणारे डोळ्यांवरील परिणाम याचा संशोधनातून शोध घेण्यात आला आहे. भारतामध्ये तर प्रौढ व्यक्तींना सिगारेटचे व्यसन मोठ्या प्रमाणात आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामुळे दरवर्षी 10 लाख लोकांचा जवळपास मृत्यू होतो.

सिगारेट ओढणाऱ्याच्या बाजूला बसणे देखील धोकादायक

सिगारेटचे व्यसन असलेल्या लोकांचे डोळे लवकर खराब होतात, असे संशोधनामधून दिसून आले आहे. जर एखाद्याला आपले डोळे सुरक्षित ठेवायचे असतील तर त्यांनी सिगारेटपासून चार हात लांब राहणे खूप जास्त गरजेचे आहे. विशेष म्हणजे सिगारेट ओढणे फक्त जो ओढत आहे त्याच्याच आरोग्यासाठी धोकादायक नसून सिगारेटच्या धुरामुळे इतरांच्या आरोग्यावर देखील खतरनाक परिणाम होतात आणि आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. याचमुळे जर आपल्या आसपास कोणी जर सिगारेट ओढत असेल तर तिथुन तुम्ही दूर जा.

सिगारेट ओढल्यामुळे होणार आजार

आपण डाॅक्टरांना अनेकदा बोलताना बघितले असेल की, लहान मुलं घरामध्ये असल्यावर अजिबात घरामध्ये सिगारेट ओढली नाही पाहिजे. तसेच सार्वजनिक ठिकाणे विशेष: दवाखान्यामध्ये अनेक बोर्ड लिहिलेले असतात की, इथे धुम्रपान करण्यास मनाई आहे…याचे कारणे म्हणजे सिगारेटच्या धुरामुळे देखील अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. ज्यांना सिगारेट ओढण्याचे व्यसन आहे. त्यांना प्रामुख्याने हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब, कर्करोग आणि डोळ्यांचे विविध आजार होण्याची शक्यता असते.

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips : दह्यापासून बनवलेले हे फेसपॅक वापरा आणि उन्हाळ्यातही तजेलदार त्वचा मिळवा!

Summer Diet : उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी या डाळींचा आहारात समावेश करा!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली