Health : नियमित व्यायामामुळे वजन तर कमी होतेच शिवाय नैराश्य दूर होण्यासही मदत होते, वाचा महत्वाचे!

शरीर तंदुरुस्त आणि निरोगी (Healthy) ठेवायचे असेल तर नियमित व्यायाम हा करावाच लागतो. नियमित व्यायाम केल्याने मन चांगले राहते, तसेच शरीराला लागणारे सर्व हार्मोन्स पण व्यवस्थित काम करतात. जर तुम्ही रोजच्या नियमानुसार 30 मिनिटे व्यायाम करू शकलात तर तुम्ही नैराश्यापासून (Depression) देखील दूर राहू शकता.

Health : नियमित व्यायामामुळे वजन तर कमी होतेच शिवाय नैराश्य दूर होण्यासही मदत होते, वाचा महत्वाचे!
व्यायाम करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 10:09 AM

मुंबई : शरीर तंदुरुस्त आणि निरोगी (Healthy) ठेवायचे असेल तर नियमित व्यायाम हा करावाच लागतो. नियमित व्यायाम केल्याने मन चांगले राहते, तसेच शरीराला लागणारे सर्व हार्मोन्स पण व्यवस्थित काम करतात. जर तुम्ही रोजच्या नियमानुसार 30 मिनिटे व्यायाम करू शकलात तर तुम्ही नैराश्यापासून (Depression) देखील दूर राहू शकता. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, जे नियमितपणे 30 मिनिटे व्यायाम करतात ते नेहमीच तंदुरुस्त राहतात. नैराश्य हा एक विकार आहे. जो अधिकाधिक लोकांना सध्याच्या जीवनशैलीमध्ये होताना दिसतो आहे. म्हणूनच निरोगी राहण्यासाठी शारीरिक व्यायाम (Exercise) जास्त करण्याचा प्रयत्न करा. नियमांनुसार व्यायाम केल्याने शरीरातील सर्व हार्मोन्सना योग्य प्रकारे काम करतात आणि अनेक आरोग्य फायदे होतात.

दररोज सकाळी 30 मिनिटे चाला

व्यायाम करण्यासाठी सकाळची वेळ अधिक फायदेशीर ठरते. यामुळे आपण दररोज सकाळी किमान 30 मिनिटे नक्कीच चालले पाहिजे. यामुळे आपल्या शरीरामधील ऊर्जा वाढण्यास मदत होते. शिवाय व्यायाम झाल्यानंतर एक कप ग्रीन टी पिणे तर अधिकच फायदेशीर ठरते. सुरूवातीला हळूहळू चालले तरीही चालते. त्यानंतर फास्ट चालण्यास सुरूवात करा.

सायकलिंग करणे देखील फायदेशीर

जर आपल्याला चालणे शक्य नसेल तर आपण दररोज सकाळी सायकल चालवायला नक्की हवी. सायकलिंग हा देखील खूप चांगला आणि फायदेशीर व्यायाम आहे. सायकलिंगमुळे वजन कमी होण्यास देखील मदत होते. विशेष म्हणजे सायकलिंग केल्याने अगदी कमी वेळेमध्ये शरीराचा चांगला व्यायाम होतो.

दोरीवरच्या उड्या मारा

जर आपल्याला बाहेर जाण्यास वेळ मिळत नसेल किंवा बाहेर जाऊन व्यायाम करणे शक्य नसेल तर आपण घरच्या-घरी एक बेस्ट व्यायाम करू शकतो, तो म्हणजे दोरीवरच्या उड्या. कारण दोरीवरच्या उड्या मारण्यासाठी आपल्याला कुठेही बाहेर वगैरे जाण्याची अजिबात गरज पडत नाही. अशावेळी आपण घरीच दोरीवरच्या उड्या मारून व्यायाम करायला हवा. किमान 50 दोरीवरच्या उड्या मारण्याचा प्रयत्न करा.

डान्स करत व्यायाम करा

घरातील कामामुळे व्यायामासाठी वेळच मिळत नसेल तर आपण घरी दोन ते तीन गाण्यांवर डान्स केला पाहिजे. डान्स करणे देखील हा एक प्रकारचा व्यायामच आहे. मात्र, डान्स करतांना रूममधील फॅन बंद ठेवा. आपल्याला शक्य आहे तेवढा प्रयत्न करा. विशेष म्हणजे डान्स करताना शरीराच्या अवयवांचा व्यायाम नेमका कसा करायचा याचे व्हिडीओ तुम्ही इंटरनेटवर देखील पाहू शकता.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या)

संबंधित बातम्या : 

AC : उन्हाळ्यात एसीचा जास्त वापर करताय? सावधान! तुम्हाला ‘या’ गंभीर समस्यांचा सामना करायला लागू शकतो…

Home Remedies : मेथी जास्त वेळ फ्रेश ठेवायचीय? करा ‘हे’ सोपे उपाय…

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.