AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AC : उन्हाळ्यात एसीचा जास्त वापर करताय? सावधान! तुम्हाला ‘या’ गंभीर समस्यांचा सामना करायला लागू शकतो…

एसीच्या अती वापराने आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. श्वसनाशी संबंधित समस्या, दमा, डिहायड्रेशन, डोकेदुखी यासह डोळे कोरडे होणे, त्वचा कोरडी होणे, अश्या समस्या जाणवतात.

AC : उन्हाळ्यात एसीचा जास्त वापर करताय? सावधान! तुम्हाला 'या' गंभीर समस्यांचा सामना करायला लागू शकतो...
AC
| Edited By: | Updated on: Apr 03, 2022 | 6:02 PM
Share

मुंबई : कडाक्याच्या उन्हापासून आणि घामापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण एअर कंडिशनरचा (Air Conditioner) वापरतात. एसीही (AC) अनेकांची अत्यावश्यक गरज बनला आहे. घर, ऑफिस, गाडी सगळीकडे एसी दिसतो. तापमान 40 अंश सेल्सिअसच्या टप्प्यात पोहोचताच अनेक लोकांनी एसीचा वापर वाढवलाय. पण तुम्हाला माहित आहे का एसीच्या अती वापराने आपल्या शरीरावर किती वाईट परिणाम होतो? श्वसनाशी संबंधित समस्या, दमा, डिहायड्रेशन (Dehydration), डोकेदुखी (Headache) यासह डोळे कोरडे होणे,त्वचा कोरडी होणे, अश्या समस्या जाणवतात. जे लोक एसीमध्ये जास्त वेळ राहतात त्यांना नाक आणि घशाशी संबंधित श्वसनाच्या समस्यांना सामोरे जावं लागतं. श्वास घेण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात. हे व्हायरल इन्फेक्शन किंवा ऍलर्जीमुळेही होऊ शकते. त्यामुळे एसीचा मर्यादित वापर करणं कधीही चांगलं.

दमा आणि ऍलर्जीचा त्रास असलेल्या लोकांसाठी एसी आणखी धोकादायक ठरू शकतो. प्रदुषणापासूनचा धोका टाळण्यासाठी काही लोक स्वतःला घरात बंदिस्त करून घेतात. पण तुम्हाला माहित आहे का की घरात बसवलेला एसी नीट साफ केला नाही तर अस्थमा आणि अॅलर्जीचा त्रास असलेल्या लोकांना त्रास होऊ शकतो. एसीमध्ये जास्त वेळ राहिल्याने आपल्या नाकाला जास्त थंड हवा लागते. बाहेरचं ऊन आणि आत एसी यामुळे सर्दी होऊ शकते. जे लोक एसीमध्ये जास्त वेळ बसतात त्यांना खाज सुटणे किंवा कोरडी त्वचेची समस्या खूप सामान्य आहे. सूर्याच्या तीव्र किरणांच्या संपर्कात राहण्यामुळे तसेच एसीमध्ये जास्त वेळ राहिल्याने त्वचेच्या कोरड्या पडण्याची समस्या वाढते. संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी यामध्ये अधिक काळजी घ्यावी.

एसीमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये डिहायड्रेशनची समस्या अधिक दिसून येते. जर एसी खोलीतील जास्त आर्द्रता शोषून घेत असेल तर तुम्हाला डिहायड्रेशनचा सामना करावा लागू शकतो. एसीमुळे होणारी डिहायड्रेशनची समस्या देखील डोकेदुखी किंवा मायग्रेनचे कारण बनू शकते. डिहायड्रेशन हे एक ट्रिगर आहे ज्याकडे अनेकदा मायग्रेनच्या बाबतीत दुर्लक्ष केले जाते. एसीमध्ये राहिल्यानंतर लगेच उन्हात बाहेर पडल्यास डोकेदुखीचा त्रास वाढू शकतो. जर तुम्हाला डोळे कोरडे होण्याची समस्या असेल तर एसीमध्ये जास्त वेळ बसणे तुमच्यासाठी तोट्याचं आहे. डोळ्यांना खाज सुटणे आणि अस्वस्थता या समस्येमुळे खूप त्रास होऊ शकतो. ड्राय आय सिंड्रोम असलेल्या लोकांना एसीमध्ये जास्त वेळ न राहण्याचा सल्ला दिला जातो.

टीप- टीव्ही 9 मराठी आपल्यापर्यंत माहिती पोहोचवत आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही.

संबंधित बातम्या

Health Tips : टोमॅटो आणि काकडीचा रस चेहऱ्यासाठी आहे खूपच उपयुक्त, जाणून घ्या फायदे…

Red Grapes : लाल द्राक्ष चेहऱ्यासाठी प्रचंड लाभदायी, जाणून घ्या फायदे…

एक उपाय आणि तुमची सिगारेट ओढण्याची समस्या कायमची बंद, जाणून घ्या रामबाण उपाय…

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.