AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care Tips : दह्यापासून बनवलेले हे फेसपॅक वापरा आणि उन्हाळ्यातही तजेलदार त्वचा मिळवा!

दही (Curd) त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्यात लैक्टिक ऍसिड असते. हे मृत त्वचेच्या पेशी बाहेर काढण्याचे काम करते. यामुळे त्वचा मुलायम होते. दह्यामध्ये असलेली प्रथिने, जीवनसत्त्वे (Vitamin) आणि खनिजे त्वचा सुंदर ठेवण्यास मदत करतात. तुम्ही इतर अनेक नैसर्गिक घटकांसह दही वापरून अनेक प्रकारचे फेसपॅक (Facepack) बनवू शकता.

Skin Care Tips : दह्यापासून बनवलेले हे फेसपॅक वापरा आणि उन्हाळ्यातही तजेलदार त्वचा मिळवा!
त्वचेच्या काळजीसाठी दही अत्यंत फायदेशीर Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 04, 2022 | 2:04 PM
Share

मुंबई : दही (Curd) त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्यात लैक्टिक ऍसिड असते. हे मृत त्वचेच्या पेशी बाहेर काढण्याचे काम करते. यामुळे त्वचा मुलायम होते. दह्यामध्ये असलेली प्रथिने, जीवनसत्त्वे (Vitamin) आणि खनिजे त्वचा सुंदर ठेवण्यास मदत करतात. तुम्ही इतर अनेक नैसर्गिक घटकांसह दही वापरून अनेक प्रकारचे फेसपॅक (Facepack) बनवू शकता. हे फेसपॅक कसे बनवायचे ते जाणून घेऊया. विशेष म्हणजे दह्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. शिवाय उन्हाळ्याच्या हंगामामध्ये तर दह्याचे फेसपॅक त्वचेसाठी अधिक फायदेशीर ठरतात.

दह्यापासून तयार होणारे फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर

  1. दही आणि हळद फेसपॅक हा फेसपॅक बनवण्यासाठी दह्यात अर्धा चमचा हळद घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटे त्वचेवर राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने तोंड धुवा. हळदीमध्ये दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. त्वचा स्वच्छ करण्यासोबतच हा फेसपॅक त्वचा चमकदार बनवण्यातही मदत करतो.
  2. दही आणि मध फेसपॅक दही आणि मध फेसपॅक आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. हा फेसपॅक तयार करण्यासाठी 2 चमचे दह्यात एक चमचा मध मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटे त्वचेवर राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने धुवा. या फेसपॅकमुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
  3. दही आणि बेसन फेसपॅक हा फेसपॅक बनवण्यासाठी 2 चमचे दह्यात एक चमचा बेसन मिसळा. ते चांगले मिसळा आणि ते त्वचेवर लावा. 10 ते 15 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. बेसन त्वचेला एक्सफोलिएट, स्वच्छ आणि चमकदार बनवण्यास मदत करते.
  4. दही आणि काकडीचा फेसपॅक कच्च्या काकडीच्या रसात दही मिसळून चेहऱ्यावर मसाज करा. त्यानंतर धुवा. हायड्रेटिंग फेसपॅकमुळे त्वचा थंड होते. हे टॅन काढून टाकण्यास मदत करते आणि तुमच्या त्वचेचा टोन सुधारते. यामुळे हा फेसपॅक उन्हाळ्याच्या हंगामामध्ये फायदेशीर आहे.
  5. दही आणि मुलतानी माती फेसपॅक आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, मुलतानी माती आपल्या चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे. मुलतानी मातीमध्ये दही मिक्स करून चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स आणि टॅनची समस्या काही दिवसांमध्येच दूर होईल. मात्र, नेहमीच दही हे ताजेच असावे.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या : 

Cleanser : तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी हे घरगुती क्लिंजर अत्यंत फायदेशीर!

Summer Diet : उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी या डाळींचा आहारात समावेश करा!

काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.