AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cleanser : तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी हे घरगुती क्लिंजर अत्यंत फायदेशीर!

तेलकट त्वचा (Oily skin) असलेल्या लोकांना त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अतिरिक्त सीबम बाहेर पडल्यामुळे त्वचेवर मुरुम येण्याची समस्या देखील निर्माण होते. तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी त्वचेची (Skin) अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. तेलकट त्वचेसाठी अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे क्लिन्झर वापरतात.

Cleanser : तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी हे घरगुती क्लिंजर अत्यंत फायदेशीर!
त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स फाॅलो करा.Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 04, 2022 | 12:19 PM
Share

मुंबई : तेलकट त्वचा (Oily skin) असलेल्या लोकांना त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अतिरिक्त सीबम बाहेर पडल्यामुळे त्वचेवर मुरुम येण्याची समस्या देखील निर्माण होते. तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी त्वचेची (Skin) अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. तेलकट त्वचेसाठी अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे क्लिन्झर वापरतात. यामुळे तुमच्या त्वचेला खूप नुकसान होऊ शकते. तेलकट त्वचेसाठी तुम्ही घरच्या घरी क्लिंजर (Cleanser) बनवू शकता. हे घरच्या घरी सहज उपलब्ध असलेल्या नैसर्गिक घटकांचा वापर करून बनवले जातात. चला तर जाणून घेऊयात क्लिंजर कसे तयार करायचे.

  1. क्लिंजर तयार करण्यासाठी मुलतानी माती घ्या. त्यामध्ये तांदळाचे पीठ आणि बेसन चांगले मिक्स करा. त्यात मध, एक चमचा लिंबाचा रस आणि काकडीचा रस घाला. ते एकत्र चांगले मिसळा. ते संपूर्ण चेहऱ्यावर तसेच मानेला लावा आणि मसाज करा. 5 ते 10 मिनिटे त्वचेवर राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा.
  2. मुलतानी माती त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. मुलतानी माती छिद्रांमधील घाण साफ करण्याचे काम करते. त्यामुळे पुरळ येण्याची शक्यता कमी होते. मुलतानी मातीचा नियमित वापर केल्याने आपली त्वचा सुधारण्यास मदत होते. मुलतानी माती त्वचेतील रक्त परिसंचरण सुधारू शकते.
  3. तेलकट त्वचेसाठी बेसन खूप फायदेशीर आहे. बेसन मुरुम, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स इत्यादीपासून बचाव करते. हे त्वचेचे पीएच संतुलन राखण्यास मदत करते. हे सीबम उत्पादन नियंत्रित करते. बेसन छिद्रांना खोलवर साफ करते आणि साचलेली घाण आणि धूळ काढून टाकते. यामुळे त्वचा स्वच्छ राहते.
  4. मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी सेप्टिक गुणधर्म असतात. यामुळे मध आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. काकडीत 90 टक्के पाणी असते. त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे काम काकडी करते. लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ऍसिड असते. हे त्वचेला एक्सफोलिएट करण्याचे आणि घाण काढून टाकण्याचे काम करते. यामुळेच मध, लिंबू आणि काकडी आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर घटक आहेत.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या : 

Summer Diet : उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी या डाळींचा आहारात समावेश करा!

Loss of Appetite : तुमचीही मुले जेवणासाठी कंटाळा करतात? मग जाणून घ्या भूक न लागण्याची कारणे!

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.