
कॅन्सर, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि महागड्या उपचारानंतर बरा झाल्याच्या अनेक प्रेरणादायी व्यक्तित्व समाजात आहेत. पण गेल्या काही दशकात कॅन्सर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. कॅन्सरवरील उपचार आणि त्यात रुग्णासह नातेवाईकाची ससेहोलपट वेदनादायी आहे. भारतासारख्या देशात प्रत्येक वर्षी कॅन्सरचे 14 लाखांहून अधिक प्रकरणं समोर येतात. तर कॅन्सरवर रामबाण उपाय शोधल्याचा दावा रशियाने केला आहे. जर हा प्रयोग सर्वच प्रकारच्या कर्करोगांवर यशस्वी झाला तर हा या दशकातील सर्वात मोठा शोध ठरणार आहे. हे मानवजातीसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नसेल. काय आहे रशियाचा दावा, ही लस कधीपासून बाजारात दाखल होणार, त्याचा कोणत्या रुग्णांना फायदा होणार याविषयी उत्सुकता आहे. कॅन्सर वॅक्सीन खरंच यशस्वी होणार का? ही लस कोणत्या प्रकारच्या कॅन्सरवर प्रभावी ठरणार? भारतासह जगभरातील रुग्ण ठीक होतील का? अशा अनेक प्रश्नावर टीव्ही 9 ने या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत जाणून घेतले. त्यात धर्मशिला नारायणा रुग्णालयातील सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागातील...