रोज मॉर्निंग वॉक करूनही वजन कमी होत नाही का ? मग.. वॉकनंतर लगेच खा ‘हे’ पदार्थ; अन्‌ लठ्ठपणाला म्हणा बाय-बाय…

| Updated on: Jun 15, 2022 | 4:03 PM

मॉर्निंग वॉकचे फायदे : रोज सकाळी तुम्ही वॉकला जात नसाल तर, सोसायटीत राहण्याचीच तुमची पात्रता नाही, असा काहींचा समज झालाय, इतका मॉर्निंग वॉकचा हा ट्रेंड सार्वत्रिक झालेला आहे. मॉर्निंग वॉक आणि आरोग्याचाही परस्पर संबंध आहेच. व्यायामाच्या या साध्या सोप्या प्रकारामुळे हळूहळू स्वतः मध्ये झालेला बदल आवडायला लागतो आणि वॉकची सवय देखील अंगवळणी पडते.

रोज मॉर्निंग वॉक करूनही वजन कमी होत नाही का ? मग.. वॉकनंतर लगेच खा ‘हे’ पदार्थ; अन्‌ लठ्ठपणाला म्हणा बाय-बाय…
माॉर्निक वॉकनंतर हे पदार्थ ठेवतील फिट
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

शरीर सुडौल होण्यासाठी, कुणी लठ्ठपणा घालवण्यासाठी (To get rid of obesity) तर कुणी निरोगी हदयासाठी मॉर्निंग वॉक हा व्यायामाचा अवलंब करतांना आपण पाहिले आहे. दिवसाची सुरूवात वॉकने करून दिवसभर प्रसन्न राहण्यासाठी लोक मॉर्निंग वॉकचा पर्याय (Morning walk option) निवडतात. मॉर्निंग वॉकचा हा ट्रेंड अनेकांच्या इतका अंगवळणी पडला आहे, की वॉकला गेले नाही तर दिवसभर खिन्न, अपराध्यासारखे वाटू लागते. आता वॉकवरून परत आल्यावर न्याहरी घ्यावी की फक्त ज्युस प्यावा, याबाबत अनेकांच्या मनात गोंधळ दिसून येतो. आरोग्यासाठी (For a healthy life) यातले काय महत्वाचे? न्याहरी की नाश्ता? हा संभ्रम बहुतांश जणांमध्ये दिसून येतो. तर, बघुयात मॉर्निंग वॉकनंतर कोणते पदार्थ खावेत जेणेकरून लठ्ठपणा कमी करण्यात तसेच उत्तम आरोग्याच्या दृष्टीने अधिक मदत होईल.

मॉर्निंग वॉकनंतरचा आहार

मॉर्निंग वॉक केल्याने तणाव आणि नैराश्य कमी होते. त्यामुळे वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय मॉर्निंग वॉक करून तुम्ही अनेक गंभीर आजारांपासून दूर राहू शकता. जसे मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी. मॉर्निंग वॉकनंतर योग्य पदार्थांचे सेवन केल्याने त्याचे फायदे वाढतात आणि तुमचे वजनही लवकर कमी होते. मॉर्निंग वॉकनंतर कोणते पदार्थ खावेत, त्याची ही जंत्री. काळजीपूर्वक वाचा, तसे करा आणि मस्त रहा.

हे सुद्धा वाचा

सुका मेवा

दाणे किंवा सुकामेवा (ड्रायफ्रूट्स). यात हेल्दी फॅट्स भरपूर असतात. तुमचे शरीर मजबूत करण्यात ते मोठी मदत करतात. एवढेच काय तर मॉर्निंग वॉकनंतर ड्रायफ्रुट्सचे सेवन केल्याने तुमची पचनशक्तीही मजबूत होते आणि वजनही कमी होते.

ओट्स खा

ओट्स फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे. त्यामुळे तुमची भूक नियंत्रित राहण्यास मदत होते. ओट्स खाल्ल्याने पुढे जास्त वेळ भूकच लागत नाही. यामुळे वजन कमी करण्यात त्याची खूप मदत होते. बरेचदा घराबाहेर असताना भूक लागते आणि आरोग्यास घातक असलेले फास्ट फूड आपल्याला खावेच लागते. नाईलाज असतो, पण ओट्स यावर रामबाण उपाय आहे. ओट्स खाल्ल्याने पुढे बराच वेळ भूक लागत नसल्याने फास्ट फूड घेण्याची वेळ आपल्यावर ओढवत नाही.

अंकुरलेले पदार्थ

मोड आलेली कडधान्ये उदाहरणार्थ मूग, वाटाणे, चणे किंवा हरभरा यात प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. यात चरबी नसते. त्यामुळेच वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत असलेल्यांचे हे आवडते अन्न आहे. मॉर्निंग वॉकनंतर याचे सेवन केल्याने आरोग्याला खूप फायदा होतो.

फळं खा

फळांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. याव्यतिरिक्त फळे शरीरासाठी आवश्यक अशी जिवनसत्त्वे आणि खनिजे या घटकांनी समृद्ध असतात. शिवाय फळांमध्ये प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स ही मोठया प्रमाणात असतात. फळे खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढत नाही त्यामुळे तुम्ही तंदुरुस्त राहता.