
मुंबई : बहुतेक लोक दररोज गरम पाण्याने अंघोळ करतात. तसेच कामावरून आल्यावर थकल्यानंतर, कुठूनही बाहेरून फिरून आल्यानंतर लोक थकवा जाण्यासाठी गरम पाण्याने अंघोळ करतात. असं म्हटलं जातं की गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर शरीराला आराम मिळतो. तर अनेक महिला मासिक पाळीमध्ये दुखणं कमी करण्यासाठी गरम पाण्याने अंघोळ करतात. पण तुम्हाला माहिती आहे का गरम पाण्याने अंघोळ करणं तुमच्या त्वचेसाठी हानिकारू ठरू शकते. गरम पाण्याने अंघोळ केल्यामुळे तुम्हाला त्वचेसंबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
गरम पाण्याने जर तुम्ही अंघोळ केली तर तुमच्या शरीरावर सुरकुत्या पडू शकतात. कारण गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर तुमच्या त्वचेवरील ओलावा निघून जातो आणि सुरकुत्या निर्माण होतात. सुरकुत्या म्हणजेच बारीक रेषा तुमच्या शरीरावरती दिसू लागतात. जर तुम्हाला हा त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि गरम पाण्याने अंघोळ करणे टाळा.
बहुतेक लोकांना गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर एक्झिमाचा त्रास निर्माण होतो. गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर बहुतेक लोकांच्या त्वचेवर एक्झिमाची लक्षणे दिसू लागतात. जसे की त्वचेवर खाज सुटणे, कोरडेपणा निर्माण होणे किंवा त्वचा लाल होणे अशी लक्षणे दिसू लागतात. तर तुम्हाला एक्झिमाचा त्रास होत असेल तर तुम्हीही गरम पाण्याने अंघोळ करणे टाळावे.
गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर त्वचेतील ओलावा निघून जातो. त्यामुळे आपल्या शरीराची त्वचा कोरडी पडते, त्वचा कोरडी पडल्यामुळे आपल्या अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी दिसू लागतात. त्यामुळे त्वचेला खाज सुटते तसेच जळजळ देखील होते. त्यामुळे ज्यांना हा त्रास निर्माण होत असेल त्यांनी गरम पाण्याने अंघोळ करणे टाळावं.