‘हा’ त्रास असेल तर कच्च्या कांद्यापासून लांबच राहिलेलं चांगलं, नाहीतर वाढेल त्रास

कांद्याचे सेवन केल्याने आपण हृदय, रक्तदाब आणि इतर समस्यांपासून सुरक्षित राहतो, परंतु जर त्याचे जास्त सेवन केले तर आपल्याला नुकसान सहन करावे लागू शकते.

हा त्रास असेल तर कच्च्या कांद्यापासून लांबच राहिलेलं चांगलं, नाहीतर वाढेल त्रास
Image Credit source: freepik
| Updated on: Jun 15, 2023 | 5:51 PM

नवी दिल्ली : छोले-भटूरेअसो वा आलू कुलचा, किंवा नान, काही चविष्ट पदार्थांसोबत कच्चा कांदा (raw onion) खाल्ला नाही तर त्यांची चव अपूर्ण वाटते. अनेक लोकांना कच्चा कांदा इतका आवडतो की ते दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात सलाडच्या स्वरूपात खातात. दुसरीकडे उन्हाळ्यात उष्माघात टाळायचा असला तरी कच्च्या कांद्याचे सेवन फायदेशीर ठरते. कांद्यामध्ये अनेक पोषक तत्व असली तरी त्याचे अतीसेवन आरोग्यालाही (effect on health) हानी पोहोचवू शकते.

रिपोर्ट्सनुसार, कांद्याचे सेवन हृदय, रक्तदाब आणि इतर समस्यांपासून सुरक्षित ठेवते, परंतु जर त्याचे जास्त सेवन केले गेले तर आपल्याला नुकसान सहन करावे लागू शकते. आरोग्याच्या काही समस्या असतील तर कच्चा कांदा खाऊ नये.

ॲसिटिडी

कांद्यामध्ये ग्लुकोज आणि फ्रक्टोजसह अनेक घटक आढळतात आणि जर ते जास्त प्रमाणात सेवन केले गेले तर त्यांचे प्रमाण साखरेमध्ये वाढते. अशा स्थितीत ॲसिटिडीचा त्रास होऊ शकतोते. याशिवाय तुम्हाला बद्धकोष्ठता असेल तरीही कच्चा कांदा खाणे टाळा कारण त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे शरीरातील बद्धकोष्ठता आणखी वाढते.

मधुमेह

जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल किंवा त्याची लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी कच्चा कांदा कमी खावा. तज्ञांच्या मते, यामुळे रक्तातील साखर आणखी कमी होऊ शकते. जर तुम्हाला सलाडमध्ये कच्चा कांदा खायचा असेल तर आधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. याशिवाय याचे सेवन केल्यानंतर रक्तातील साखरेची पातळीही तपासत रहावी.

कमकुवत पचनशक्ती

जर काही कारणाने तुमचे पचन कमकुवत असेल किंवा पोटाशी संबंधित समस्या असेल तर अशा स्थितीत कांदा खाणे टाळा. कच्च्या कांद्यामुळे पचनाच्या समस्या आणखी वाढू शकतात, असे मानले जाते.

शस्त्रक्रिया

तज्ञांच्या सांगण्यानुसार, ज्या लोकांची नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे त्यांनी कच्चा कांदा खाणे टाळावे. रिपोर्ट्सनुसार, कच्चा कांदा खाल्ल्याने रक्त गोठण्याची समस्या होऊ शकते. या अवस्थेत कच्च्या कांद्याचे सेवन केल्याने रक्तातील साखर देखील कमी होऊ शकते. शस्त्रक्रियेच्या एक आठवडा आधी आणि नंतर कांदा खाणे टाळावे, असे तज्ज्ञ सांगतात.