Sleeping Naked Benefits : कपडे न घालता झोपण्याचे आहेत अनेक फायदे, तुम्हाला माहीत आहेत का ?याच

| Updated on: Mar 13, 2023 | 3:20 PM

बहुतांश लोक हे कपड्यांशिवाय झोपणं पसंत करतात, पण बहुतेकांना त्याच्या फायद्यांविषयी माहीत नसते. कपडे न घालता झोपल्यास स्ट्रेस तर कमी होतोच पण शरीराला इतरही अनेक लाभ मिळतात.

Sleeping Naked Benefits : कपडे न घालता झोपण्याचे आहेत अनेक फायदे, तुम्हाला माहीत आहेत का ?याच
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली : चांगली व शांत झोप ही आपल्या आरोग्यासाठी (sound sleep) अतिशय आवश्यक गोष्टींपैकी एक आहे. जर तुम्हाला नीट झोप लागच नसेल तर त्याचा तुमच्या पुढल्या दिवसावर परिणाम होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीनेही ते धोकादायक ठरू शकते. अनेक लोकं कपडे न घालता झोपणं पसंत करातात. पण, कपड्यांशिवाय झोपणे (sleeping without clothes)किती फायदेशीर ठरू शकते हे तुम्हाला माहित आहे का ? कपड्यांशिवाय झोपण्याचे अनेक फायदे आहेत. रात्री झोपताना हे एखाद्या टॉनिकपेक्षा कमी काम करत नाही. विवस्त्र झोपणे हे शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्टीने आश्चर्यकारक (mental benefits of sleeping without clothes) आरोग्य फायदे देते. कपड्यांशिवाय झोपण्याचे काय फायदे आहेत, त्यामुळे आराम कसा मिळतो, हे जाणून घेऊया.

एंग्झायटी होते कमी

हे सुद्धा वाचा

कपड्यांशिवाय झोपण्याचा फायदा मेंदूवर दिसून येतो. यामुळे मेंदूमध्ये शरीराला आराम देणारे हार्मोन्स बाहेर पडतात. जोडीदारासोबत झोपल्यास ऑक्सिटोसिनची पातळी वाढते. कपड्यांशिवाय झोपताना शरीराचे तापमानही नियंत्रित राहते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही.

हृदयविकाराचा धोका कमी होतो

झोपेचा थेट परिणाम हृदय आणि मनावर होतो. झोप न मिळाल्याने उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकाराचा धोका असतो. कपडे काढून झोपल्याने चांगली झोप येण्यास मदत होते. त्यामुळे हृदयविकारासह इतर आजार होण्याचा धोका खूप कमी झाला आहे.

प्रजनन क्षमता वाढते

विवस्त्र झोपण्याचा मोठा परिणाम पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवरही दिसून आला आहे. याबाबत नुकताच एक अभ्यास करण्यात आला. जे लोक घट्ट अंडरवेअर घालतात त्यांच्या शुक्राणूंची संख्या कमी होते. या संशोधनात एकूण 656 लोकांचा समावेश करण्यात आला. ज्यांनी घट्ट अंडरवेअर घातले होते, त्यांच्यामध्ये शुक्राणूंची संख्या कमी दिसली.

मेटाबॉलिज्म सुधारते

कपड्यांशिवाय झोपण्याचा परिणाम शरीरावर दिसून आला आहे. असे केल्याने, ब्राऊन फॅट्सचे उत्पादन वाढते. हे शरीरात चयापचय म्हणजेच मेटाबॉलिज्म सुधारण्याचे काम करते. योग्य मेटाबॉलिज्म झाल्यामुळे वजन वाढत नाही. यामुळे लठ्ठपणाशी संबंधित आजार होत नाहीत, तर चेहऱ्यावर चमकही दिसून येते.

वेदना कमी होतात

विवस्त्र झोपल्याने रक्ताभिसरण उत्तेजित होते आणि वेदना कमी होतात. विशेषत: पोटाच्या भागातील वेदना कमी होतात आणि अधिक आराम मिळतो व चांगली झोप लागते.

झोप सुधारते

कपडे घालून झोपण्यापेक्षा विवस्त्र झोपणे हे चांगल्या झोपेसाठी चांगले असते. शरीराचे तापमान कमी होते आणि जर तुम्ही कपडे घातलेले असतील तर झोपेचे चक्र विस्कळीत होते. त्यामुळे झोप डिस्टर्ब होते आणि तुम्ही रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर वळत राहता व नीट झोप लागत नाही. विवस्त्र झोपल्यास झोपेची गुणवत्ता वाढते व लहान बळासारखी शांत व गाढ झोप लागते.