आई शप्पथ! एका वर्षात भारतीय इतकी साखर फस्त करतात

| Updated on: Mar 13, 2022 | 1:57 PM

अमेरिकन लोकांबद्दल लिहिताना डॉ. मार्क हायम म्हणतात, की सरासरी अमेरिकन एका वर्षात सुमारे 22 किलो रिफाईंड साखरेचे सेवन करीत असतो. तर दुसरीकडे भारतीय लोक दरवर्षी सरासरी सुमारे 14 किलो साखरेचा आपल्या आहारात समावेश करतात.

आई शप्पथ! एका वर्षात भारतीय इतकी साखर फस्त करतात
Follow us on

साखरेचे योग्य प्रमाण शरीरासाठी फायदेशिर असले तरी कालांतराने त्याचा अतिरेक झाल्यास अनेक शारीरिक व्याधींचा सामना करावा लागत असतो. सामान्य लोकांच्या तुलनेत मधुमेहाच्या रुग्णांसाठी साखर अत्यंत घातक आहे. मधुमेही रुग्णांसाठी साखर विषासारखे काम करते. साखरेचा ग्लायसेमिक इंडेक्स 70 असतो म्हणजे एकदा का ती शरीरात शिरली की ती रक्तात खूप वेगाने मिसळते आणि रक्तातील साखरेची पातळी (Blood sugar levels) खूप वेगाने वाढते. ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असलेल्या गोष्टींचाही आपल्या हार्मोन (Hormones) इन्सुलिनवर घातक परिणाम होतो. एखादी गोष्ट जितक्या वेगाने रक्तातील साखर वाढवते तितकी ती आपल्या इन्सुलिन हार्मोनला चालना देते. या वैज्ञानिक कारणास्तव, साखरेचे सेवन मधुमेहाच्या (diabetics) रुग्णासाठी विशेषतः हानिकारक मानले जाते. बाजारात साखरेचे असे काही पर्याय आहेत, ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स शून्य आहे आणि ज्यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. त्यांच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी वाढत नसल्याने त्याचा इन्सुलिनवर कोणताही परिणाम होत नाही. जरी हे साखरेचे पर्याय नैसर्गिक नसले तरी ते अतिशय काळजीपूर्वक आणि संतुलित प्रमाणात सेवन केले पाहिजेत.

1. स्‍टीविया

हा साखरेचा चांगला पर्याय आहे. हे Stevia rebaudiana नावाच्या झाडापासून बनवले जाते. हे चवीला खूप गोड असते. हे झाड बहुतेक ब्राझील आणि पॅराग्वेमध्ये आढळते. स्टीविया ग्लायसेमिक इंडेक्सवर शून्य आहे, याचा अर्थ असा की त्याच्या सेवनाने रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी वाढत नाही. म्हणूनच तो साखरेचा चांगला पर्याय मानला जातो.

2. एरिथ्रिटॉल

हे एक शुगर अल्कोहल आहे, जे रासायनिक प्रक्रियेद्वारे तयार केले जाते. एरिथ्रिटॉल हे कॉर्न आंबवून आणि त्यात काही एन्झाईम्स घालून बनवले जाते. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही साखरेला हा एक चांगला पर्याय असू शकतो. तुम्हाला केटो कुकीज, केटो चॉकलेट आणि मधुमेहासाठी अनुकूल खाद्यपदार्थांमध्ये साखरेच्या जागी एरिथ्रिटॉल हे नाव आढळेल. हे साखरेसारखे गोड आहे, परंतु रक्तातील साखरेची पातळी वाढवत नाही कारण त्याचा ग्लायसेमिक निर्देशांक शून्य आहे.

संतुलीत सेवन करा

तुम्ही जर स्टीविया आणि एरिथ्रिटॉलचे सेवन करत असले तरी या गोष्टींचा वापर काळजीने करायला हवा. हे दोन्ही रासायनिक साखरेसाठी चांगले पर्याय असू शकतात, परंतु येथे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की ते देखील अत्यंत संतुलित प्रमाणात सेवन केले पाहिजे. हे देखील एक प्रकारचे केमिकल असल्याने जास्त खाल्ल्याने पोट फुगणे, गॅस इत्यादी समस्या निर्माण होउ शकतात.

संबंधित बातम्या

तुम्हाला वारंवार भूक लागते का?, सावध व्हा… तुम्हाला मधुमेह असू शकतो!

असे मसाले जे आरोग्यासाठी ठरतील ‘सुपरफूड’… 60 टक्के आजारांचा धोका टळतो

त्वचेच्या आरोग्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश हवाच…