AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असे मसाले जे आरोग्यासाठी ठरतील ‘सुपरफूड’… 60 टक्के आजारांचा धोका टळतो

दालचिनी धमन्या आणि नसांमध्ये रक्त परिसंचरण सुधारण्याचे काम करते. याव्यतिरिक्त, त्यात रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे गुणधर्मदेखील असतात. शरीरात वाढणारे आणि बाहेरून आक्रमण करणारे रोगजंतू मारण्यात दालचिनीची महत्त्वाची भूमिका असते.

असे मसाले जे आरोग्यासाठी ठरतील ‘सुपरफूड’... 60 टक्के आजारांचा धोका टळतो
आरोग्य
| Edited By: | Updated on: Mar 13, 2022 | 11:49 AM
Share

अनेकदा आपल्या आजूबाजूला असे अनेक पदार्थ असतात ज्यांच्या गुणधर्मांची आपणाला माहितीदेखील नसते. आपले शरीर तंदुरुस्त व रोगमुक्त ठेवण्यासाठी त्या पदार्थांची आपल्याला मोलाची मदत होत असते. परंतु केवळ माहितीअभावी आपण त्याकडे दुर्लक्ष करीत असतो. कोरोना काळात आपल्यातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आपल्याला अनेक पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यातीलच एक होते ते आपल्याच किचनमध्ये सहज उपलब्ध होणारे विविध प्रकारचे मसाले घटक. हे पदार्थ अँटी-बॅक्टेरियल (Anti-bacterial) गुणधर्मांपासून ते अँटी-ऑक्सिडंट, कर्करोगविरोधी (Anti-cancer) गुणधर्मांनी परिपूर्ण समजले जात असतात. फक्त त्या पदार्थांचा योग्य उपयोग आणि महत्त्व आपल्याला कळले पाहिजे. हे सर्व प्रामुख्याने मसाले, औषधी वनस्पती (Herbs) या सर्व गोष्टींचा आपल्या दैनंदिन आहारात समतोल आणि माफक प्रमाणात वापर केला, तर सर्व 60 टक्के आरोग्य समस्या यातूनच दूर होण्यास मदत होते.

1) तुळशी : तुळस हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले अँटि-ऑक्सिडंट घटक रक्त स्वच्छ करण्याचे काम करतात. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. तुळशीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात.

2) काळी मिरी : आपण जे काही पोषक तत्व घेतो, ते पचवण्याच्या आणि शरीरातील पोषक तत्वे शोषून घेण्याच्या प्रक्रियेत काळी मिरी महत्त्वाची भूमिका बजावते.

3) लाल मिरची : चयापचय मजबूत करते आणि रक्ताभिसरण वाढवण्याचे काम लाल मिरची करते.

4) दालचिनी : धमन्या आणि नरांमध्ये रक्त परिसंचरण सुधारण्यासाठी कार्य दालचिनीच्या माध्यमातून होत असते. तसेच यातून रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते.

5) लवंग : वातावरणातील विषारी, सूक्ष्मजंतू, जीवाणू आणि बॅक्टेरियापासून शरीराचे संरक्षण करते. याव्यतिरिक्त लवंगमध्ये कर्करोग विरोधी गुणधर्म देखील असतात.

6) धणे : रक्तातील साखरेची पातळी कमी करते. शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते.

7) जिरे : रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्याचे काम करते. यामध्ये कॅन्सरविरोधी घटक भरपूर प्रमाणात असतात.

8) आले : पचनशक्ती सुधारण्याचे काम करते. हे दाहक-विरोधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्याचे काम करते.

9) ओरेगॅनो : यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात आणि शरीराला आतून डिटॉक्स करण्याचे काम करते.

10) ओवा : श्वासातील दुर्गंधी घालवण्याचे काम ओवाच्या माध्यमातून होते. यामध्ये अँटिऑक्सिडंट घटक भरपूर प्रमाणात असतात. हे शरीरातील ट्यूमर वाढण्यापासून रोखण्याचे काम करते.

11) रोझमेरी : रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते.

12) ऋषी वनस्पती : हे मेंदूसाठी खूप फायदेशीर आणि उपयुक्त आहे. हे अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध आहे.

13) अजवाइन फ्लॉवर : फुफ्फुसांसाठी फायदेशीर ठरते शिवाय फुफ्फुसांना मजबूत आणि सक्षम बनवण्याचे काम करते. यामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात.

14) हळद : हे हृदयासाठी खूप उपयुक्त ठरत असते. कर्करोग विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे.

संबंधित बातम्या : 

चांदीचे दागिने काळे पडल्यास ‘असे’ करा स्वच्छ, चमकतील अगदी नव्यासारखे…

जेवणातल्या हळदीचे अनेक लाभदायक फायदे, हळदीबद्दल आहारतज्ज्ञ काय म्हणतात?

ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....