Winter Health Tips: रात्रभर स्वेटर घालून झोपणे हानिकारक, उद्भवतात या समस्या

हिवाळा येताच लोक उबदार कपड्याच्या मदतीने थंडीपासून बचाव करतात. काही लोक असे असतात जे रात्रभर स्वेटर घालून झोपतात, मात्र ही सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

Winter Health Tips: रात्रभर स्वेटर घालून झोपणे हानिकारक, उद्भवतात या समस्या
Image Credit source: Freepik
| Updated on: Dec 20, 2022 | 1:34 PM

नवी दिल्ली – डिसेंबर महिना सरताना थंडीचा (winter) प्रभावही वाढताना दिसत आहे. राजधानीसह देशातील अनेक भागात धुक्यासोबतच थंडीनेही जोर पकडला आहे. अशा परिस्थितीत लोक थंडीपासून वाचण्यासाठी अनेक उपाय करतात. थंडी वाजू नये, उबदार वाटावे म्हणून कोणी गरम पाण्याने अंघोळ करतं तर कोणी स्वेटरसह अनेक उबदार कपडे (warm clothes) घालतात. पण काही लोक असेही आहेत, जे झोपतानाही रात्रभर स्वेटर (sweater) घालतात. मात्र ही सवय हानिकारक ठरू शकते. रात्री स्वेटर घालून झोपल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात.

खाज सुटणे व रॅशेस येणे

झोपताना रात्रभर स्वेटर घातल्याने त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. यामुळे रॅशेसची समस्या उद्भवू शकते. एवढंच नव्हे तर स्वेटर खूप कोरडा असतो, त्यातील तंतूमुळे त्वचेला हानी पोहोचते, ज्यामुळे शरीराला खाज सुटण्याची समस्या सुरू होते.

ब्लड प्रेशर वाढू शकते

झोपताना उबदार कपडे घातल्याने रक्तदाबावरही परिणाम होऊ शकतो. जर तुम्हीही रात्री स्वेटर घातला असेल आणि त्यावर ब्लँकेट पांघरले तर शरीरातील उष्णता बाहेर पडायला जागा मिळत नाही. अशा परिस्थितीत रक्तदाब वाढू शकतो. तसेच, बीपी आणि मधुमेहाच्या रुग्णांना चक्कर येणे किंवा अस्वस्थ वाटणे यासारखा त्रासही होऊ शकतो.

श्वास घेण्यास त्रास होणे

जर तुम्हालाही रात्री स्वेटर घालून झोपण्याची सवय असेल तर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. खरं तर, उबदार कपड्यांमध्ये झोपल्याने ऑक्सिजन ब्लॉक होतो, ज्यामुळे गुदमरल्यासारखे वाटते किंवा भीती अथवा चिंता वाटू लागते. त्यामुळे तुम्हाला श्वासोच्छवासाशी संबंधित कोणताही त्रास असेल तर तर स्वेटर घालून झोपू नये.

त्वचा कोरडी होते

हिवाळ्यात थंड वाऱ्यामुळे त्वचा कोरडी होते. अशा परिस्थितीत स्वेटर घालून झोपल्यास कोरड्या त्वचेची समस्या आणखी वाढू शकते. तसेच ज्या लोकांना लोकरीची ॲलर्जी आहे त्यांनीही रात्री स्वेटर घालून झोपणे टाळावे. अन्यथा त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

हृदयरोगाचा त्रास असलेल्यांसाठी ठरते धोकादायक

जर एखाद्या व्यक्तीला हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर त्या व्यक्तीने झोपताना रात्रभर स्वेटर घालू नये, ते खूप हानिकारक ठरू शकते. खरंतर उबदार वाटावं म्हणून जे कपडे आपण घालतो, त्यामध्ये असलेली बारीक छिद्रे शरीरातील उष्णता रोखतात, जी हृदयरोग्यांसाठी धोकादायक ठरू शकते.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)