AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20I WC : चाललंय काय हे? हर्षितनंतर आणखी एक बॉलर स्पर्धेतून आऊट, दुखापतीमुळे 24 तासांत तिघांचा गेम

Icc T20i World Cup 2026 : आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या सुरुवातीआधीच 3 वेगवेगळ्या संघातील प्रत्येकी 1 असे एकूण 3 गोलंदाज दुखापतीच्या जाळ्यात अडकले. त्यामुळे या तिघांना वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलंय.

T20I WC : चाललंय काय हे? हर्षितनंतर आणखी एक बॉलर स्पर्धेतून आऊट, दुखापतीमुळे 24 तासांत तिघांचा गेम
Jasprit Bumrah and Harshit Rana Team IndiaImage Credit source: Icc X account
| Updated on: Feb 07, 2026 | 5:18 PM
Share

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला सुरुवात झालीय. स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सवर मात करत विजयी सुरुवात केलीय. मात्र क्रिकेट चाहत्यांना भारत विरुद्ध यूएसए या सामन्याची प्रतिक्षा आहे. हा सामना संध्याकाळी 7 वाजेपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. त्याआधी 6 वाजता रंगारंग कार्यक्रमाचा थरार असणार आहे. मात्र त्याआधी एक वाईट बातमी समोर आली आहे. हर्षित राणा याच्यानंतर आणखी एका गोलंदाजाला टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे टीमच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे.

खेळाडूंची दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर होण्याची मालिका सुरुच आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज एशान मलिंगा गेल्या 24 तासांत दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर होणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. एशानला खांद्याच्या दुखापतीमुळे या महत्त्वाच्या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलंय. एशानच्या जागी प्रमोद मदुशन याचा संघात समावेश करण्यात आला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

इतर 2 गोलंदाज कोण?

एशानआधी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि मोठे फटके मारण्याची क्षमता असलेला हर्षित राणा याला दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेला मुकावं लागलं. हर्षितच्या जागी मोहम्मद सिराज याचा समावेश करण्यात आला. तर त्याआधी ऑस्ट्रेलियाचा वेगवान आणि प्रमुख गोलंदाज जोश हेझलवूड याला दुखापतीमुळे या स्पर्धेला मुकावं लागलं.

एशानला काय झालं?

एशानला इंग्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेत दुखापत झाली होती. श्रीलंका मायदेशात इंग्लंड विरुद्ध 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळत होती. एशानला मालिकेतील दुसऱ्या टी 20i सामन्यात ही दुखापत झाली होती. एशानने आतापर्यंत 8 टी 20i सामन्यांत 8 विकेट्स मिळवल्या आहेत.तसेच एशानच्या जागी संधी मिळालेल्या प्रमोद मदुशन याने 8 टी 20i सामन्यांत 12 विकेट्स मिळवल्या आहेत.

श्रीलंकेचा मंलिगा वर्ल्ड कपममधून आऊट

श्रीलंकेचा पहिला सामना कधी?

दरम्यान श्रीलंका टी 20i वर्ल्ड कप मोहिमेतील आपला पहिला सामना हा 8 फेब्रुवारीला आयर्लंड विरुद्ध खेळणार आहे. श्रीलंकेचा बी ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे.

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी श्रीलंकेचा सुधारित संघ : दासुन शनाका (कर्णधार), कुसल परेरा, दुश्मंता चमीरा, कुसल मेंडीस, वानिंदु हसारंगा, कामिंडु मेंडिस, चरिथ असलंका, जनिथ लियानागे, प्रमोद मदुशन, पाथुम निसांका, महीश तीक्षणा, कामिल मिसारा, दुनिथ वेल्लालागे, पवन रथनायके आणि मथीशा पथिराना.

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश