AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Icc T20i World Cup 2026 : श्रीलंकेकडून मुदतीनंतर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर, कॅप्टन कोण?

Sri Lanka Squad For Icc T20i World Cup 2026 : सहयजमान असलेल्या श्रीलंका क्रिकेट संघाची टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी घोषणा करण्यात आली आहे. जाणून घ्या श्रीलंकेने कुणाला संधी दिलीय.

Icc T20i World Cup 2026 : श्रीलंकेकडून मुदतीनंतर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर, कॅप्टन कोण?
Sri Lanka Cricket TeamImage Credit source: Icc
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 02, 2026 | 10:38 PM
Share

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी सराव सामन्यांच्या थराराला सुरुवात झाली आहे. इंडिया ए टीमने सराव सराव सामन्यात यूएसएवर मात करत विजयी सुरुवात केली आहे. तर स्पर्धेला अवघे काही दिवस बाकी असताना श्रीलंका क्रिकेट बोर्डाने 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्यासाठी आयसीसीकडून ठराविक मुदत दिली जाते. सर्व सहभागी देशांना त्या मुदतीआधी संघ जाहीर करावा लागतो. मात्र श्रीलंकेने विशेष परवानगी घेऊन मुदतीनंतर संघ जाहीर केला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्यासाठी 31 जानेवारी ही अंतिम मुदत होती. श्रीलंका यासह वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करणारी शेवटची टीम ठरली आहे.

श्रीलंकेचा कॅप्टन कोण?

श्रीलंका या मोहिमेतील आपला पहिला सामना हा 8 फेब्रुवारीला खेळणार आहे. तर श्रीलंकेचा साखळी फेरीतील शेवटचा सामना हा 19 फेब्रुवारीला झिंबाब्वे विरुद्ध होणार आहे. निवड समितीने ऑलराउंडर दासुन शनाका याला टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. दासुन शनाका डिसेंबर महिन्यापासून श्रीलंकेचं नेतृत्व करत आहे. निवड समितीने या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी अनुभवी खेळाडूंचा संघात समावेश केला आहे. यामध्ये कुसल मेंडीस, पाथुम निसांका, कुसल परेरा, आणि चरिथ असलंका यांचा समावेस आहे.

तसेच 4 ऑलराउंडर खेळाडूंचा समावेश केला आहे. या चौघांमध्ये कामिंदु मेंडीस, दुनिथ वेल्लालगे आणि वानिंदु हसरंगा यांचा समावेश आहे. या त्रिकुटावर बॅटिंगसह बॉलिंग अशी दुहेरी जबाबदारी असणार आहे. मथीशा पथिराणा, महीश तीक्षणा आणि दुश्मंथा चमीरा या तिघांवर गोलंदाजाची मदार असणार आहे. तसेच इशान मलिंगा याचीही निवड करण्यात आली आहे. श्रीलंका 10 व्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचा सहयजमान आहे. श्रीलंका साखळी फेरीतील सर्व सामने हे मायदेशातच खेळणार आहे. श्रीलंका कोलंबोत 2 तर पल्लेकेलेत 2 असे एकूण 4 साखळी सामने खेळणार आहे.

श्रीलंकेच्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यांचं वेळापत्रक

विरुद्ध आयर्लंड, 8 फेब्रुवारी, कोलंबो,

विरुद्ध ओमान, 12 फेब्रुवारी, पल्लेकेले

विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 16 फेब्रुवारी, पल्लेकेले

विरुद्ध झिंबाब्वे, 19 फेब्रुवारी, कोलंबो

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी श्रीलंका क्रिकेट टीम : दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, कामिल मिशारा, कुसल मेंडिस, कामिंदू मेंडिस, कुसल जानिथ परेरा, चारिथ असलंका, जनिथ लियानागे, पवन रथनायके, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेल्लालगे, महेश तीक्षाना, दुष्मंथा चमीरा, मथीशा पाथीराना आणि एशान मलिंगा.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...