
नवी दिल्ली | 17 ऑगस्ट 2023 : आजकाल बिघडलेली लाइफस्टाइल आणि वेगाने बदलणाऱ्या खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे लोकांना विविध आजार, आरोग्य (health problems) समस्या ग्रासतात. विशेषत: महिला या घरचं कामकाज आणि जबाबदाऱ्या यामुळे त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. ज्यामुळे त्यांच्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात.
खांदेदुखी किंवा खांद्यांमध्ये वेदना (shoulder pain) होणे हा सामान्य आजार आहे, ज्याचा अनेक लोकांना विशेषत: महिलांना जास्त त्रास होतो. अलिकडच्या काही वर्षांत, महिलांमध्ये खांद्याच्या आरोग्याच्या समस्या सामान्य झाल्या आहेत. अशा परिस्थितीत, हा त्रास कशामुळे होतो आणि ते कसे हाताळावे, हे जाणून घेणे आवश्यक आहे.
या कारणांमुळे होतात खांद्यामध्ये वेदना
गतीहीन जीवनशैली
आजकाल, वेळेअभावी, लोक शारीरिक हालचाली अर्थात व्यायाम करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत कमी शारीरिक हालचालींमुळे खांदेदुखी वाढू लागते. डेस्कवर जास्त वेळ काम केल्याने आणि कमी व्यायामाने खांद्याचे स्नायू कमकुवत होऊ शकतात. हालचालींच्या या अभावामुळे खांद्याच्या सांध्यावर दबाव येऊ शकतो, परिणामी वेदना आणि अस्वस्थता जाणवू लागते.
खराब पोश्चर
अनेक प्रकरणांमध्य बसण्याची चुकीची किंवा खराब स्थिती, पोश्चर यामुळे खांदेदुखी उद्भवू शकते. खांद्यावर येणार ताण आणि वेदना कमी करण्यासाठी कामाच्या ठिकाणी योग्य पोझिशनमध्ये बसावे. अन्यथा त्रास वाढू शकतो.
वाढत्या कामाचे प्रेशर आणि ताण
आजकाल प्रत्येक व्यक्तीला कामाचे वाढते प्रेशर आणि ताण यामुळे समस्या सहन कराव्या लागत आहेत. विशेषत: महिलांना ऑफिस आणि घर या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, त्यामुळे त्यांच्या तणावाची पातळी वाढू शकते. खांदा आणि मान दुखणे हे अनेकदा तणावाच्या शारीरिक लक्षणांपैकी एक असते. अशा परिस्थितीत तणावामुळे होणाऱ्या खांद्याच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल केले पाहिजेत. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
खांद्याचा सतत वापर
टायपिंग, पेटिंग किंवा खेल यांसारख्या हालचालींमध्ये खांद्याचा सतत वापर होतो, ज्यामुळे स्नायूंवर दाब येऊन त्यामध्ये वेदना होणे व सूज येणे असा त्रास होऊ शकतो. यापासून बचावासाठी नियमित पण आराम, स्ट्रेचिंग आणि कामाची योग्य पद्धत याकडे लक्ष दिले तर खांद्याच्या वेदना कमी करता येतात.
हार्मोन्समध्ये बदल
हार्मोनल बदलांमुळे देखील महिलांचा खांदा दुखू शकतो. हार्मोन्समधील बदलांमुळे सांध्यांवर परिणाम होतो, ज्यामुळे वेदना आणि नुकसान होण्याचा धोका वाढतो. अशा वेळी आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारून, नियमित व्यायाम आणि योग्य वैद्यकीय सल्ला याच्या मदतीने खांदेदुखीवर नियंत्रण मिळवता येते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)