या’ लोकांनी चुकूनही करू नये रक्तदान.. जाणून घ्या, ठरावीक लोकांना का? रोखले जाते रक्तदान करण्यापासून

| Updated on: Jun 14, 2022 | 8:10 PM

जागतिक रक्तदाता दिन 2022: रक्तदानाविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. या दिवसानिमीत्त लोकांना रक्तदानाचे महत्व सांगण्याबरोबरच कोणत्या व्यक्तीला रक्तदान करता येत नाही हे जाणून घेणेही महत्वाचे आहे.

या’ लोकांनी चुकूनही करू नये रक्तदान.. जाणून घ्या, ठरावीक लोकांना का? रोखले जाते रक्तदान करण्यापासून
Follow us on

मुंबईः कोणत्याही अपघातामुळे किंवा अन्य कारणाने रक्ताची झीज भरून काढण्यासाठी रक्तदानाची गरज (The need for blood donation) असते. रक्तदानाविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. आपल्या देशात दररोज सुमारे 40 हजार रक्तदानाची गरज भासते जेणेकरुन कॅन्सरपासून ते शस्त्रक्रिया (From cancer to surgery) आणि अपघातामुळे जीवन-मरणाची झुंज देत असलेल्या लोकांना वाचवता येईल. रक्तदानामुळे इतरांना नवसंजीवनी मिळते म्हणून त्याला महादान म्हणतात. परंतु रक्तदान करणे प्रत्येकाला शक्य नसते. काही जुने आजार असल्यास, रक्ताशी संबधित काही समस्या असल्यास, याशिवाय टॅटू केलेल्या लोकांनीही (Even people with tattoos) रक्तदान करू नये असे सांगीतले जाते. काही कारणांनी ठरावीक लोकांनी रक्तदान केले तरी, ते स्विकारले जात नाही, जाणून घ्या कोणत्या लोकांनी रक्तदान करू नये.

टॅटू केलेल्या लोकांनी रक्तदान करू नये

जर तुम्ही टॅटू किंवा छेदन केले असेल तर तुम्ही रक्तदान करू नये. टॅटू आणि छेदन करताना तुमच्या शरीरात विविध प्रकारच्या सुया टोचल्या जातात. असे मानले जाते की, यामुळे हिपॅटायटीस विषाणूचा प्रसार होण्याचा धोका वाढतो. तज्ज्ञांचे मत आहे की टॅटू आणि छेदन करणाऱ्यांनी किमान 4 ते सहा महिने रक्तदान करू नये.

ज्यांना प्रतिजैविक आहेत

ज्या लोकांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाला आहे आणि ते त्यासाठी अँटीबायोटिक्स घेत आहेत, अशा लोकांनी ते पूर्णपणे निरोगी होईपर्यंत रक्तदान करू नये. अन्यथा संसर्ग दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात पोहोचू शकतो.

रक्त कमी असल्यास

जर एखाद्या व्यक्तीचे शरीर खूप कमजोर असेल, त्याच्या शरीरातील हिमोग्लोबिन 12 पेक्षा कमी असेल तर रक्तदान करू नये. अशा परिस्थितीत रक्त दिल्याने त्यांची तब्येत बिघडू शकते. म्हणून, रक्त देण्याआधी, आपण हिमोग्लोबिन चाचणी करणे आवश्यक आहे.

या आजारांनी ग्रस्त लोक

ज्या लोकांना गेल्या वर्षभरात कावीळ किंवा हिपॅटायटीसचा आजार झाला आहे, कॅन्सरवर उपचार सुरू आहेत, मुरुमांचे औषध घेत आहेत किंवा कोणत्याही प्रकारचे लसीकरण झाले आहे, अशा लोकांनीही रक्तदान करू नये.

सर्दाचा त्रास असल्यास

ज्या लोकांना सर्दी-पडसेचा त्रास आहे, त्यांनीही रक्तदान करू नये. अशा स्थितीत रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला कोणतीही अडचण येत नाही, मात्र त्यांच्या रक्तातून सर्दी-सर्दीचे विषाणू गरजूंच्या शरीरात पसरतात. यामुळे त्याला त्रास होऊ शकतो.