10 वर्षांपूर्वीच दिसतात हार्ट अटॅकची ही लक्षणं, हृदय स्वत:च देते सावध होण्याचा इशारा

हृदयाचा झटका अचानक येत नाही. शरीर १० वर्षे आधीपासूनच आपल्याला सावध करीत असते. यासंदर्भात शरीर काय संकेत देते हे जाणून घ्या आणि वेळीच सावध व्हा

10 वर्षांपूर्वीच दिसतात हार्ट अटॅकची ही लक्षणं, हृदय स्वत:च देते सावध होण्याचा इशारा
heart disease
| Updated on: Aug 11, 2025 | 6:25 PM

नेहमी लोक असा विचार करतात की हृदयाचा झटका अचानक येतो. परंतू वास्तवता ही आहे की आपलं शरीर अनेक वर्षांपूर्वीच आपल्याला सावध करीत असते. परंतू हा इशारा इतका साधा आणि किरकोळ असतो की आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करीत असतो. अलिकडेच झालेल्या संशोधनात आणि डॉक्टरांचा सल्ला सांगतो की हृदय विकाराचा झटका येण्याआधी किमान १० ते १२ वर्षांपूर्वी शरीरात बदल सुरु होतात. ज्यात सर्वात महत्वाचे म्हणजे शारीरिक क्रिया घटण्याने याची सुरुवात होते.

शारीरिक सक्रियता कमी होते

काही डॉक्टरांच्या मते मध्यम आणि वेगवान गतीच्या शारीरिक क्रिया उदा. सायकल चालवणे, पोहणे अशा क्रिया आपण करण्यास असमर्थ होतो. हृदय विकाराचा झटका येण्याच्या १२ वर्षे आधी या प्रक्रीया करता येत नाही. जरी वय वाढल्यानंतर या काही प्रमाणात शरीर शिथिल होते. आणि पहिल्यासारख्या शारीरिक क्रिया आपल्याला करता येत नाहीत. ते लोक पुढे जाऊन हृदय विकाराचे बळी ठरतात. त्याचे हे प्रमाण वेगाने तेव्हा कमी होते आणि स्पष्ट दिसते खासकरुन आजाराच्या दोन वर्षे आधी ते संपूर्ण बंद होते.

JAMA Cardiology प्रकाशित अहवालात संशोधकांनी तरुण ते मध्यम वयांच्या लोकांचा अभ्यास केला. त्यांना आढळले ती ज्या लोकांना पुढे जाऊन हार्टअटॅक आला किंवा अन्य कार्डिओव्हॅस्क्युल समस्या निर्माण झाल्या. त्यांची शारीरिक सक्रीयता सुमारे १२ वर्षांपूर्वी सातत्याने घटत गेली. आणि शेवटच्या दोन वर्षांत तर ही सक्रीयता एकदमच कमी झाली. जे आजार जवळ आल्याचा संकेत होता

का गरजेच्या आहेत नियमित शारीरिक हालचाली?

तज्ज्ञ सल्ला देतात की जीवनभरात प्रत्येक आठवड्यात किमान १५० मिनिटांचा मध्यम ते तेज शारीरिक हालचालीचा गरजेचे आहेत. तज्ज्ञांच्या मते हृदयाचा आजार बळावल्यानंतर एक्सरसाईज सुरु करणे उशीराचे होऊ शकते. योग्य पद्धत ही आहे की सुरुवातीपासूनच एक्टीव्ह लाईफस्टाईल आपलीशी करणे आणि त्यात सातत्य ठेवणे योग्य असते.

कसे ओळखावे आणि बचाव करावा ?

जर तुम्हाला वाटले की तुमच्या एक्टिविटी लेव्हल हळूहळू घटत आहे तर दुर्लक्ष करु नका

दिवसभर अधिक चाला, जिने चढणे आणि हलका-फुलका व्यायाम करण्याची सवय अंगी बाणवा

नियमित आरोग्याची तपासणी करा, खास करुन कुटुंबाचा हृदया विकाराचा इतिहास असेल

तणाव कमी करा, संतुलित आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या