
कोणत्याही महिलेसाठी मासिक पाळी येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मासिक पाळी ठरलेल्या वेळेत येणं देखील फार महत्त्वाचं असतं. नाहीतर महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मासिक पाळी दरम्यान वेदना आणि रक्तस्त्राव हे तुमच्या प्रजननक्षमतेबद्दल आणि आरोग्याबद्दल बरेच काही सांगू शकतात. स्त्रीच्या मासिक पाळीच्या चक्रावर जीवनशैली, अन्न, झोप आणि इतर अनेक घटकांचा प्रभाव असतो.
तुम्हाला माहित आहे का, ताण आणि तणावामुळे तुमच्या मासिक पाळीला उशीर होऊ शकतो? त्यामुळे वेदना आणि रक्तस्त्राव देखील प्रभावित होऊ शकतो. ताणतणावामुळे मासिक पाळी किती दिवसांसाठी लांबू शकते आणि मासिक पाळी थांबू देखील शकते.
स्त्रीरोगतज्ज्ञांकडून यासंबंधी काही गोष्टी जाणून घेऊया. ताणतणावामुळे मासिक पाळी किती दिवस उशिरा येऊ शकते? स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणतात की ताणतणावामुळे तुमच्या मासिक पाळीवर परिणाम होऊ शकतो. यामुळे, महिन्याचं सायकल मागे – पुढे होऊ शकतं… एवढंच नाही तर, पाळी दोन – तीन महिने उशिराने देखील येऊ शकते.
जर तुम्ही दीर्घकालीन ताणतणावात असाल, तर कधीकधी तुमच्या मासिक पाळी आठवडे किंवा महिनेही उशिरा येऊ शकतात. ताण आपल्या संपूर्ण शरीरावर परिणाम करतो. याचा परिणाम केवळ ओव्हुलेशनवरच होत नाही तर मासिक पाळी नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवरही होतो.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जेव्हा तुम्ही तणावाखाली असता तेव्हा शरीराच्या अनेक कार्यांवर परिणाम होतो. ज्यामुळे पिट्यूटरी ग्रंथीमधून बाहेर पडणाऱ्या प्रजनन संप्रेरकांचे उत्पादन देखील कमी होते आणि या संप्रेरकाची कमतरता मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम करते.
डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, ‘तणावामुळे मासिक पाळी किती दिवस उशिरा येईल याची कोणतीही निश्चित वेळ मर्यादा नाही. काही महिलांसाठी ती काही दिवस असू शकते तर काही महिलांसाठी ती काही आठवडे असू शकते. कधीकधी, ताणामुळे, मासिक पाळी लवकर देखील येऊ शकते.’
इतकेच नाही तर ताणतणावामुळे मासिक पाळीतील क्रॅम्प, रक्तस्त्राव आणि पीएमएसच्या लक्षणांवर परिणाम होतो. जर तुम्ही बराच काळ तणावाखाली असाल तर याचा तुमच्या मासिक पाळीवर किंवा मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मासिक पाळीचे चक्र निरोगी ठेवण्यासाठी निरोगी जीवनशैली आवश्यक आहे. तणावापासून दूर राहणे देखील आवश्यक आहे. जर तुम्हाला इतर कोणत्याही आरोग्याशी संबंधित समस्या असतील तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.