गरोदरपणात फिरायला जात असाल तर तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

गरोदरपणात बाहेर फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून काही खबरदारी घेणे खूप महत्वाचे आहे. याबद्दल डॉक्टरांचे काय म्हणणे आहे ते जाणून घेऊया.

गरोदरपणात फिरायला जात असाल तर तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे या गोष्टी ठेवा लक्षात
Travel tips During Pregnancy for a safe journey explained by expert
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 30, 2025 | 7:40 PM

गरोदरपणात स्त्रियांना अनेक गोष्टींची अधिक काळजी घेतली जात असते. तसेच या दिवसांमध्ये विश्रांती घेण्यासोबतच योग्य आहारही घ्यावा लागतो. याशिवाय गरोदरपणात प्रवास करताना खूप काळजी घेतली पाहिजे. प्रवास करायला कोणाला आवडत नाही, विशेषतः उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होताच प्रत्येकाला कुठेतरी बाहेर फिरायला जावेसे वाटते. यामुळे तुमची दैनंदिन दिनचर्या देखील बदलते, ज्याचा तुमच्या शरीरावर आणि मनावर परिणाम होऊ शकतो.

दुसरीकडे, जर तुम्हाला गरोदरपणात प्रवास करायचा असेल तर तुम्ही अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून तुमच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही आणि तुमचा प्रवास सुरक्षित राहील. जर तुम्हीही गरोदरपणात बाहेर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर डॉक्टरांनी सांगितलेल्या या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे..

डॉक्टरांचा सल्ला घ्या

वरिष्ठ सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रिया गुप्ता सांगतात की, फिरायला जाण्यापूर्वी, तुम्ही तुमची आरोग्य तपासणी करून घेतली पाहिजे, विशेषतः जर तुम्हाला कोणताही जुनाट आजार असेल किंवा तुम्ही नियमितपणे औषधे घेत असाल तर. औषधे, अल्ट्रासाऊंड आणि काही आवश्यक चाचण्याचे रिपोर्ट सोबत ठेवणे चांगले. फिरायला जाण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. नेहमी तुमच्यासोबत प्रथमोपचार किट, आवश्यक औषधे, सॅनिटायझर आणि मास्क ठेवा. तपासणी केल्यानंतर डॉक्टर तुम्हाला योग्य सल्ला देतील.

तुमच्या आहाराची काळजी घ्या

प्रवास करताना जंक फूड, तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाऊ नका. तसेच स्वच्छ पाणी प्या. अनेकदा लोक प्रवास करताना असे काहीही पदार्थ विकत घेतात आणि खातात जे नंतर त्यांच्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरते. यासाठी तुमचा आहार पूर्णपणे निरोगी असावा याची विशेष काळजी घ्या. तसेच तुमच्या डॉक्टरांनी कोणते पदार्थ खाण्यास मनाई केली आहे ते अजिबात खाऊ नये.

विश्रांती घ्या

गरोदर स्त्रिला प्रवासा दरम्यान थकवा येणे खूप सामान्य आहे. म्हणून विश्रांती घ्या आणि पुरेशी झोप घ्या. थकवा आणि झोपेचा अभाव तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकतो. झोपेच्या कमतरतेमुळे थकवा आणि ताण वाढू शकतो, जे गरोदरपणात अजिबात योग्य नाही.

आरामदायी सीट निवडा

प्रवास करताना आरामदायी सीट निवडा. जर तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करत असाल तर वॉशरूमजवळील सीट निवडा. कारण या दिवसांमध्ये गरोदर महिलांना अनेक वेळा वॉशरूममध्ये जावे लागू शकते. तसेच प्रवासादरम्यान सैल आणि आरामदायी कपडे घाला, विशेषतः प्रवास लांब असेल तर. तसेच, सीट बेल्ट लावा. प्रवासादरम्यान, मध्येच उठून सुरक्षित ठिकाणी चालत जा किंवा काही शारीरिक हालचाल करा. या दिवसांमध्ये आपल्यासोबत घरातील एखादी व्यक्ती सोबत असावी. परंतु अशी कोणतीही क्रिया करू नका ज्यामुळे पडण्याची भीती वाटेल किंवा तुम्हाला खूप थकवा जाणवेल.

माहिती मिळवा

प्रवासादरम्यान, तुम्ही ज्या ठिकाणी जात आहात त्या ठिकाणाचे हवामान, अन्न आणि पिण्याचे पाणी खाची चौकशी करा. तसेच, अशा ठिकाणी जाणे टाळा जिथे तुम्हाला खूप चढावे लागेल किंवा चालावे लागेल. त्या ठिकाणाच्या आजूबाजूच्या रुग्णालये आणि डॉक्टरांची माहिती घ्या. जेणेकरून कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास, तुम्ही विलंब न करता डॉक्टरांशी संपर्क साधू शकता.