Home Remedies for Viral Fever: ऋतू बदलताच तुम्हालाही येतो का ताप ? हे घरगुती उपाय करा फॉलो

| Updated on: Dec 12, 2022 | 4:48 PM

बदलत्या ऋतूमानानुसार अनेक लोकांना व्हायरल फिव्हरचा त्रास सुरू होतो. या घरगुती उपायांनी तुम्ही त्यापासून मुक्ती मिळवता येऊ शकते.

Home Remedies for Viral Fever: ऋतू बदलताच तुम्हालाही येतो का ताप ? हे घरगुती उपाय करा फॉलो
Follow us on

नवी दिल्ली – हिवाळ्याचा ऋतू (winter season) येताच आपल्या आजूबाजूला अनेक बदल घडू लागतात. थंडीमुळे आपल्या खाण्यापासून ते राहणीमानापर्यंत जीवनशैलीत अनेक बदल होतात. पण याच बदलत्या ऋतूचा (change in climate) आपल्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो. हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती (immunity) कमकुवत होते, ज्यामुळे आपण बऱ्याच वेळेस अनेक आजारांना बळी पडतो. कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे, संसर्गजन्य ताप येण्याचे प्रमाण वाढू लागते. अशा परिस्थितीत, या काळात स्वतःची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. काही घरगुती उपायांच्या मदतीने या समस्येपासून मुक्ती मिळू शकते.

आलं

आल्यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. हिवाळ्यात आल्याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. जर तुम्ही सर्दी-खोकला किंवा तापाच्या समस्येने हैराण असाल तर त्यापासून आराम मिळण्यासाठी आलं उपयुक्त ठरतं. यासाठी आल्याची पेस्ट तयार करून त्यात मध मिसळून त्याचे सेवन करा. तुम्ही आलं शिजवूनही खाऊ शकता.

हे सुद्धा वाचा

दालचिनी

संसर्गामुळे अनेकदा घसा खवखवणे, खोकला, सर्दी अशा समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत दालचिनी खूप उपयुक्त ठरते. यासाठी एक कप पाण्यात एक छोटा चमचा दालचिनी पावडर मिसळा आणि नंतर हे पाणी उकळून गाळून घ्यावे. कोमट झाल्यावर हे पाणी प्यावे, त्याने आराम मिळेल.

तुळस

तुळस ही खूप औषधी असते हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. त्याचे अनेक गुणधर्म असून ती आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. तुळशीची पाने, अँटीबायोटिक गुणधर्मांनी समृद्ध असतात. तुळशीच्या पानांमुळे विषाणूजन्य संसर्ग रोखण्यास मदत होते. सर्दी , खोकला किंवा ताप असेल तर तुळशीची पाने पाण्यात उकळवून ते पाणी कोमट करून प्यायल्यास आराम मिळतो.

ओवा

आरोग्याच्या अनेक समस्यांवर ओवा हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. पोटासाठी फायदेशीर असलेला ओवा हा तापावरही खूप गुणकारी ठरतो. संसर्गजन्य ताप असेल
ओव्याचे पाणी उकळून ते प्यायल्याने आराम मिळतो.

काळी मिरी

गरम मसाला म्हणून वापरण्यात येणारी काळी मिरी ही तापामध्येही गुणकारी ठरते. एक चमचा हळद, एक चमचा काळी मिरी, एक चमचा सुंठ पावडर, थोडा गूळ एक कप हे सर्व पाण्यात उकळून घ्यावे. पाणी निम्मे झाल्यावर गॅस बंद करावा व गार करून ते पाणी प्यावे.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)