Turmeric Milk | हंगामी ताप, सर्दी आणि खोकल्याशिवाय हळदीचे दूध ‘या’ आजारांमध्ये प्रभावी!

Turmeric Milk | हंगामी ताप, सर्दी आणि खोकल्याशिवाय हळदीचे दूध ‘या’ आजारांमध्ये प्रभावी!

हळद अँटीबॅक्टेरीयल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. केवळ सर्दी-खोकलाच नव्हे, तर इतर आजारांवरही हळदीचे दूध प्रभावी ठरते.

Harshada Bhirvandekar

|

Dec 14, 2020 | 3:59 PM

मुंबई : हळदीचे दूध (Turmeric Milk) हे नेहमीच आपल्या भारतीय परंपरेचा एक भाग बनले आहे. भारतीयांच्या स्वयंपाकघरात मसाल्यांची कमतरता नाही आणि त्यामध्ये हळदीला विशेष महत्त्व आहे. हळदीशिवाय  कोणतेही भारतीय स्वयंपाकघर अपूर्ण आहे. हळद जवळजवळ प्रत्येक घरात वापरली जाते. सर्दी-खोकला किंवा इतर वेळीही बरे वाटत नसल्यास उपाय म्हणून आपल्या घरात हळदीच्या दुधाला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. हळद अँटीबॅक्टेरीयल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. केवळ सर्दी-खोकलाच नव्हे, तर इतर आजारांवरही हळदीचे दूध प्रभावी ठरते (Turmeric Milk can improve your health and immunity).

  1. सूज कमी करते

हिवाळ्याच्या दिवसांत काही लोकांना वारंवार सांधेदुखीची समस्या उद्भवत असते. हळदीचे दूध सांधेदुखीमध्ये सर्वात प्रभावी ठरते. तसेच, हळदीचे दूध सूज कमी करण्यास देखील उपयुक्त आहे. हळदमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे कर्करोगाचा धोका कमी करण्यास देखील उपयुक्त आहेत.

  1. सर्दी आणि खोकल्यात प्रभावी

जेव्हा लोकांना सर्दी आणि खोकला येतो तेव्हा, घरातील लोक त्यांना हळदीचे दूध प्यायला लावतात. वास्तविक, हळदीच्या दुधात असलेले प्रतिजैविक शरीरातील मुक्त रॅडिकल पेशीविरूद्ध लढा देतात. यामुळे, जर हळद दुधात मिसळली आणि तिचे सेवन केले तर लवकर आराम मिळतो. तसेच घसा खवखवणे आणि हंगामी ताप कमी होतो (Turmeric Milk can improve your health and immunity).

  1. हृदय निरोगी ठेवण्यास प्रभावी

हृदय निरोगी ठेवण्यासाठीही हळद अतिशय प्रभावी ठरते. हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे आपले हृदय निरोगी राहण्यास मदत होते. हळदीचे दूध आपल्या रक्तातील साखरेची पातळी संतुलित करते. ज्यामुळे आपले आरोग्य देखील निरोगी राहते,

  1. छान झोप लागते

हळद असलेले दूध पिण्यामुळे तुमची झोपेची समस्या देखील दूर होते. हळदीयुक्त दुधाच्या सेवनाने चांगली झोप लागते. दुधात अमीनो अॅसिड असतात, जे चांगली झोप देण्यास प्रभावी ठरतात. जर, तुम्हीलाही झोपेच्या समस्या असतील, तर तुम्ही आजपासून हळदचे दूध पिणे सुरू केले पाहिजे. याने तुम्हाला बराच फायदा होईल.

  1. कर्करोगाच्या रुग्णांसाठी फायदेशीर

हळदीचे दूध कर्करोगाच्या रुग्णांसाठी देखील खूप चांगले मानले जाते. हळदीमध्ये आढळणारा करक्युमीन हा घटक कर्करोगाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. तसे, तो कर्करोगाच्या रुग्णांना बरे होण्यासही मदत करतो.

(महत्त्वाचं : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. आपण आहाराबद्दल तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

(Turmeric Milk can improve your health and immunity)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें