
नवी दिल्ली – आज 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कॅन्सर दिवस (World Cancer Day) साजरा केला जातो. जगभरातील लोकांना कॅन्सरबद्दल जागरूक करण्यासाठी दरवर्षी हा दिवस जागतिक कॅन्सर दिवस म्हणून साजरा केला जातो. कॅन्सरबद्दल बोलायचं झालं तर आपल्या अन्नामधील काही बॅक्टेरिया (bacteria) आपल्या जोखमीवर परिणाम करू शकतात. काही जीवाणू आपल्या शरीराला कॅन्सरशी (fight with cancer) लढायला मदत करतात, तर काही ट्यूमर वाढण्यास आणि विकसित होण्यास मदत करतात. काही अशा पदार्थांबद्दल जाणून घेऊया ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.
कसा वाढतो कॅन्सरचा धोका ?
मानवी शरीरात सहकार्य आणि संघर्ष कसा होतो, शरीराचे शोषण करण्यासाठी कॅन्सर कसा विकसित झाला असेल हेही त्यात पाहण्यात येते. आपले अन्न आणि जीवाणू आपल्या शरीरातील पेशी एकमेकांशी संवाद साधण्याच्या मार्गावर कसा परिणाम करतात आणि कर्करोगाचा धोका वाढवतात किंवा कमी करतात, हेही एका संशोधनाद्वारे उघड झाले आहे.
प्रोसेस्ड व अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ ठरतात धोकादायक
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सामान्य अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न खाल्ल्याने कॅन्सरचा धोका वाढू शकतो. कॅन्सर रिसर्च युनायटेड किंगडम आणि वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंड यांनी केलेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. हॉट डॉग्स, चिप्स, सोडा आणि आइस्क्रीम इत्यादी अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडचे सतत सेवन केल्याने लठ्ठपणा आणि उच्च कोलेस्ट्रॉलचे गंभीर परिणाम होतात तसेच कॅन्सरचा धोका वाढतो असा दावा या अभ्यासात करण्यात आला आहे.
या कॅन्सरचा धोका वाढतो
अल्ट्रा प्रोसेस्ड फूड जास्त खाल्ल्याने गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका वाढतो. जे लोक जास्त जंक फूड खातात त्यांना गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका 30 टक्के जास्त असतो. संशोधकांच्या मते, प्रोसेस्ड अन्न खाल्ल्याने कोणत्याही कॅन्सरचा धोका 2 टक्के आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका 19 टक्क्यांनी वाढू शकतो. प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये फ्रेंच फ्राईज, सोडा, स्टोअरमधून विकत घेतलेल्या कुकीज, केक, कँडी, डोनट्स, आइस्क्रीम, सॉस आणि पिझ्झा यासारख्या गोष्टींचा समावेश होतो.