Vitamin D : सुंदर आणि निरोगी राहायचेय तर मग आहारात या गोष्टींचा समावेश करा

चांगले आरोग्य हवे असेल तर योग्य आहार घेणं खूप महत्त्वाचे असते. आहार घेत असताना तो सर्वसमावेशक असला पाहिजे. जेणेकरुन सगळी जीवनसत्व आपल्या शरीरात गेली पाहिजे. त्यापैकीच एक महत्त्वाचे जीवनसत्व म्हणजे व्हिटामिन सी. ज्याच्यामुळे आपण निरोगी राहू शकता. जाणून घ्या ते कशापासून मिळते.

Vitamin D : सुंदर आणि निरोगी राहायचेय तर मग आहारात या गोष्टींचा समावेश करा
Follow us
| Updated on: Mar 15, 2024 | 9:38 PM

व्हिटॅमिन-सी : तुम्हाला जर चांगले आरोग्य हवे असेल तर तुम्हाला व्हिटॅमिन-सी अत्यंत आवश्यक आहे. त्याच्या कमतरतेमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्वचेपासून ते हिरड्यांपर्यंत अनेक वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजाराला स्कर्वी असे म्हणतात. यामध्ये हिरड्यांमधून रक्त येणे, त्वचेच्या आत रक्त येणे, दात कमकुवत होणे अशी लक्षणे दिसू शकतात. निरोगी राहण्यासाठी व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असणे अत्यंत आवश्यक आहे.

व्हिटॅमिन सी हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे. त्यामुळे ते शरीर साठवून ठेवता येत नाही. त्यामुळे जर तुम्हाला व्हिटामिन सीची कमतरता असेल तर ती आहारातून नियमितपणे पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. काही खाद्यपदार्थ आहेत ज्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते.

व्हिटॅमिन सी हे एक प्रमुख अँटिऑक्सिडेंट आहे, जे खराब रॅडिकल्सशी लढून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करते. हे त्वचेचे रक्षण करते, हाडे आणि दात मजबूत ठेवते आणि संसर्गाचा धोका देखील कमी करते.

एका गुसबेरीमध्ये सुमारे 600 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते. यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.

ब्रोकोली

एक कप चिरलेल्या ब्रोकोलीमध्ये 81.2 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते, जे हाडे मजबूत ठेवते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते.

स्ट्रॉबेरी

एक कप स्ट्रॉबेरीमध्ये 90 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते. हे हृदयासाठी चांगले असते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

लिंबू

एका मोठ्या लिंबामध्ये 60 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते. हे पचन सुधारते आणि ताजेपणा आणि ऊर्जा वाढवते.

पपई

एक कप चिरलेली पपई सुमारे 88 मिलीग्राम व्हिटॅमिन सी प्रदान करते. हे पचन सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

अननस

एक कप चिरलेल्या अननसात 78.9 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते, जे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करते.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.