डोळ्यांची पापणी फडफडण्याचे काय असतात संकेत ? Eye Surgeon सांगितले नेमके कारण

अनेकदा डोळ्यांच्या समस्यांना आपण हलक्यात घेत असतो. परंतू डोळ्यांच्या फडफडण्यामागे नेमके काय कारण असते ? या संदर्भात डोळ्यांच्या डॉक्टरांनी यामागे नेमके काय कारण आहे हे सांगितले.

डोळ्यांची पापणी फडफडण्याचे काय असतात संकेत ? Eye Surgeon सांगितले नेमके कारण
Eye Twitching
| Updated on: Jan 02, 2026 | 9:22 PM

अनेकदा आपल्या डोळ्यांची पापणी कधी-कधी फडफडते. अनेकदा उजव्या डोळ्यांची पापणी फडफडणे शुभ संकेत मानले जातात. डाव्या डोळ्यांची पापणी फडफडणे अशुभ मानले जात. परंतू वैद्यकीयदृष्ट्या डोळ्यांची पापणी फडफडणे (Eye Twitching) काही तरी शारीरिक समस्येमुळे होऊ शकते. सर्वसाधारण तणाव वा थकव्याने असे होऊ शकते.परंतू जर जास्तच वेळ डोळ्यांची पापणी फडफडू लागली तर ही काही तरी आरोग्यविषयक समस्या असू शकते. या संदर्भात आय एण्ड रेटीनाचे सर्जन डॉ. भानू पांगते यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरुन माहिती शेअर केली आहे.

डोळ्यांची पापणी का फडफडते ?

डॉ. भानु पांगते यांनी सांगितले की डोळ्यांच्या पापण्या फडफडण्यास ब्लेफेरोस्पाझ्म म्हटले जाते. यात डोळ्यांची पापणी कोणत्याही कारणाशिवाय अचानक फडफडू लागते. सुरुवातीला रुग्णांना हे जाणवत नाही. परंतू अनेकदा ही समस्या इतकी गंभीर होते की डोळ्यांच्या फडफडता अचानक बंद होतात. डॉक्टरने या समस्येसाठी अनेक छोटे मोठे कारणे असू शकतात.

ड्राय आईज म्हणजे डोळे कोरडे झाल्याने डोळ्यांच्या पापण्या फडफडू लागतात

– शरीरात मॅग्नेशियमची कमतरता

– चेहऱ्यावर लकवा मारल्यानंतर चुकीच्या पद्धतीने रिकव्हरी होत असेल तर

– एखाद्या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरने म्हणजे मेंदूच्या बिघाडाने डोळ्यांची पापणी फडफडू शकते.

डॉक्टर कसे ट्रीट करतात समस्या –

डोळ्यांच्या पापण्या फडफडण्याचे कारण जाणण्यासाठी अनेकदा डॉक्टरांना MRI चाचणी करण्याच सल्ला देतात. यात मेंदूत काही समस्या किंवा गाठ तर नाही ना याची तपासणी केली जाते. या समस्येचा एक चांगला उपचार म्हणजे बोटॉक्स लावणे. बोटॉक्स लावल्याने वय वाढल्याने पापण्या फडफडण्याच्या समस्येला रोखता येते. परंतू अडचण अशी की हे बोटॉक्स व्यक्तीला वारंवार घ्यावे लागतात.

वारंवार डोळ्यांच्या पापण्या फडफडत असतील तर काय करावे ?

जर तुमच्या डोळ्यांच्या पापण्या वारंवार फडफडत असतील तर या समस्येला हलक्यात घेऊ नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि समस्येच्या मुळाशी जा. योग्य वेळी उपचार करा. म्हणजे या समस्येतून सुटका मिळेल.

( डिस्क्लेमर – ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे, योग्य माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या )