2026 मध्ये घडणार भयंकर घटना, त्या भविष्यवाणीने उडाली जगाची झोप, मधमाशा अन् सत्ता परिवर्तन
2026 मध्ये जगात काय -काय घडामोडी होणार याबाबत आता फ्रान्सचे प्रसिद्ध भविष्यवेत्ता असलेल्या नॉस्ट्राडेमस यांचं भाकीत समोर आलं आहे. यामध्ये अशा अनेक घटनांचा उल्लेख केला आहे, ज्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.

2026 नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. दरम्यान 2026 मध्ये जगात काय -काय घडामोडी होणार याबाबत आता फ्रान्सचे प्रसिद्ध भविष्यवेत्ता असलेल्या नॉस्ट्राडेमस यांचं भाकीत समोर आलं आहे. नॉस्ट्राडेमसच्या भाकीतानुसार 2026 हे वर्ष भयंकर विध्वंसक असणार आहे. नॉस्ट्राडेमस यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवलं आहे की, 2026 मध्ये एका मोठ्या जागतिक नेत्याची हत्या होऊ शकते. तसेच अनेक देशांमध्ये सत्तांतरे घडवून येतील. प्रचंड प्रमाणात राजकीय उलथापालथ होईल. नॉस्ट्राडेमसचं खरं नाव मिशेल डी नॉस्ट्राडेमस होतं. त्यांचा जन्म 16 व्या शतकात झाला, ते एक जगप्रसिद्ध ज्योतिषी आणि चिकित्सक होते. त्यांनी 1555 मध्ये लिहिलेल्या एका पुस्तकामध्ये पुढील काळात जगभरात काय -काय प्रमुख घटना घडणार आहेत, हे लिहून ठेवलं आहे.
नॉस्ट्राडेमसने आपल्या पुस्तकारत म्हटलं होतं की 2026 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये रक्ताच्या नद्या वाहतील, त्यांचं हे भाकीत वाचून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं कारण स्वित्झर्लंड हा खूप शांत देश आहे. परंतु नॉस्ट्राडेमस वर्तवलेलं हे भाकीत काही प्रमाणात खरं ठरल्याचं दिसून येत आहे. नुकतीच स्वित्झर्लंडमधील एका मोठ्या हॉटेलला आग लागली होती, या घटनेमध्ये काही लोकांचा मृत्यू झाला. काही लोकांनी या घटनेला नॉस्ट्राडेमसच्या भाकिताशी जोडलं आहे.
मधमाशा आणि सत्ता परिवर्तन
नॉस्ट्राडेमसने 1555 मध्ये जे पुस्तक लिहिलं आहे, त्यामध्ये मधमाशांचा रहस्यमयरित्या उल्लेख करण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मते इथे नॉस्ट्राडेमसने मधमाशांचा अर्थ सत्ताधाऱ्यांच्या झुंडीशी जोडला आहे, 2026 मध्ये अनेक देशांवर हुकमशाही येऊ शकते, असं भाकीत यातून नॉस्ट्राडेमसने वर्तवल्याचं बोललं जात आहे. एवढंच नाही तर नॉस्ट्राडेमसने आणखी एक मोठी भविष्यवानी केली आहे, दोन बलाढ्य देशात या वर्षी युद्ध होईल आणि हे युद्ध सात महिने चालेल. या युद्धामुळे संपूर्ण जग प्रभावित होईल असं देखील त्यांनी म्हटलं आहे. तसेच या वर्षी जगाला भूकंप, महापूर अशा संकटांचा देखील सामना करावा लागू शकतो असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
