शरीर शुद्ध करणारं डिटॉक्स पाणी काय असतं? ते कसं बनवावं?

आपण आपल्या दिवसाची सुरुवात डिटॉक्स पाण्याने देखील करू शकता जे आपल्या शरीरातील सर्व अशुद्धी दूर करते. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी डिटॉक्स वॉटर बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. काकडी, मध, लिंबू, पुदिना आणि आल्याच्या मदतीने हे डिटॉक्स वॉटर तयार केले जाते, जे आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करते.

शरीर शुद्ध करणारं डिटॉक्स पाणी काय असतं? ते कसं बनवावं?
How to make detox water
Image Credit source: Social Media
| Updated on: Jun 14, 2023 | 3:57 PM

मुंबई: अनेक जण सकाळची सुरुवात चहा, कॉफी किंवा गरम पाण्यात लिंबू मिसळून करतात. त्याचबरोबर काकडी, लिंबू, पुदिना आणि आल्याचे पाणी सकाळचे पेय म्हणून पिणेही अनेकांना आवडते. परंतु आपण आपल्या दिवसाची सुरुवात डिटॉक्स पाण्याने देखील करू शकता जे आपल्या शरीरातील सर्व अशुद्धी दूर करते. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी डिटॉक्स वॉटर बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. काकडी, मध, लिंबू, पुदिना आणि आल्याच्या मदतीने हे डिटॉक्स वॉटर तयार केले जाते, जे आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी हे डिटॉक्स पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील सर्व विषारी पदार्थ सहज बाहेर पडतात. यासोबतच तुमचे शरीर हायड्रेटेड देखील राहते, तर चला जाणून घेऊया डिटॉक्स वॉटर कसे बनवायचे.

डिटॉक्स वॉटर तयार करण्यासाठी आवश्यक घटक

  • 4-5 तुकडे काकडी
  • 7-8 पुदिन्याची पाने
  • 1 लहान तुकडा आले
  • 2 लिंबाच्या फोडी

डिटॉक्स पाणी कसे बनवावे?

  • डिटॉक्स वॉटर बनवण्यासाठी आधी काचेची बाटली घ्या.
  • नंतर त्यात पाणी, काकडीचे 4-5 तुकडे आणि पुदिन्याची 7-8 पाने घाला.
  • यासोबत त्यात आल्याचा एक छोटा तुकडा आणि लिंबाचे 2 तुकडे घालावे.
  • मग तुम्ही हे पाणी मिसळून रात्रभर असेच ठेवा.
  • आता तुमचे डिटॉक्स वॉटर तयार आहे.
  • यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करावे.
  • तुम्हाला हवं असेल तर दिवसभर या पाण्याचं सेवन करू शकता.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)