AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरीरात पाण्याची कमतरता असेल तर शरीर देतं ‘हे’ संकेत!

उन्हाळ्यात डिहायड्रेशन ही एक सामान्य समस्या आहे, परंतु आपल्याला माहित आहे का की जेव्हा डिहायड्रेशनची समस्या उद्भवते तेव्हा शरीर आपल्याला आधीच सिग्नल देते. आपण डिहायड्रेट झाल्यावर शरीर आपल्याला काय संकेत देते हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

शरीरात पाण्याची कमतरता असेल तर शरीर देतं 'हे' संकेत!
dehydrate bodyImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 01, 2023 | 3:34 PM
Share

पाणी शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. आपण पाण्याशिवाय जीवन जगू शकत नाही. एखादी व्यक्ती जितके जास्त पाणी पिते, तितका त्याला फायदा होतो. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर अनेक आजार आपल्याला घेरू शकतात. उन्हाळ्यात डिहायड्रेशन ही एक सामान्य समस्या आहे, परंतु आपल्याला माहित आहे का की जेव्हा डिहायड्रेशनची समस्या उद्भवते तेव्हा शरीर आपल्याला आधीच सिग्नल देते. आपण डिहायड्रेट झाल्यावर शरीर आपल्याला काय संकेत देते हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

त्वचा कोरडी होते

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेमध्ये कोरडेपणा येतो, ज्यामुळे त्वचेला खाज सुटणे, पुरळ येणे अशा समस्या उद्भवू लागतात. अशावेळी जर तुमची त्वचाही कोरडी असेल तर समजून घ्या की तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता आहे.

मूत्रमार्गाच्या समस्या

जर तुमच्या लघवीचा रंग हलका पारदर्शक असेल तर समजून घ्या की तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता नाही, पण जर लघवीचा रंग पिवळा असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण हे पाण्याच्या कमतरतेचे लक्षण आहे. होय, जर तुम्हालाही अशा समस्येला सामोरे जावे लागत असेल तर विसरूनही त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि लगेच पाणी प्यायचे प्रमाण वाढवा.

तोंडातून दुर्गंधी

शरीरात पाणी नसल्यामुळे तोंड आणि घशात कोरडेपणा येतो, त्यामुळे श्वास घेताना तोंडातून दुर्गंधी येते. त्यामुळे जर तुम्हालाही तोंडातून दुर्गंधी येत असेल तर सावध राहायला हवं आणि भरपूर पाणी प्यावे.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान