
मुंबई: बहुतेक लोकांना त्यांच्या हातातील नसा दिसतात. हातांच्या शिरा दिसणे ही एक सामान्य गोष्ट आहे. याने कुठल्याही गोष्टीची समस्या येत नाही. परंतु काही लोकांना हातावर शिरा दिसल्या की असं वाटतं काहीतरी समस्या आहे किंवा रोग आहे. आज आपण याच समस्येबद्दल बोलणार आहोत. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हाताच्या शिरा का दिसतात? चला तर मग जाणून घेऊयात.
हातांच्या नसा दिसण्याचे एक कारण वजन कमी होणे असू शकते. ज्या लोकांचं वजन कमी असतं त्यांच्या हातावर नसा दिसतात. जेव्हा हातांवर चरबी कमी होते तेव्हा शिरा बाहेर पडतात.
व्यायाम केल्यास रक्ताभिसरण वाढते. त्यामुळे हातांच्या शिराही दिसतात. याशिवाय जेव्हा आपण जास्त वजन उचलतो तेव्हा स्नायूंवर ताण येतो. यामुळे नसा सुजतात.
शिरांना सूज येण्याचे कारण अनुवांशिक देखील असू शकते. जर तुमच्या आई-वडिलांच्या किंवा इतर कुणाच्याही हातात शिरा फुगलेल्या असतील तर या शिरा तुमच्याही दिसण्याची दाट शक्यता आहे.
याशिवाय वयोमानानुसार हातांच्या शिराही बाहेर पडू लागतात. खरं तर वयानुसार त्वचा पातळ होत जाते. यामुळे हातावरील शिरा अधिक दिसतात. जसजसे शिरा वाढतात तसतसे रक्तवाहिन्यांमधील व्हॉल्व्ह कमकुवत होतात, ज्यामुळे नसांमध्ये रक्त जमा होते आणि शिरा फुगलेल्या दिसू लागतात.
(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)