AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवाचं दर्शन घेतल्यानंतर लोक मंदिराच्या गाभाऱ्यात का बसतात? अनेकांना माहिती नाही उत्तर, कारण…

प्रत्येकजण मंदिरात जातो आणि देवाचं दर्शन घेतल्यानंतर काही वेळ मंदिराच्या गाभाऱ्यात बसतो. पण यामागील काय कारण असतं? अनेकांना माहिती नाही उत्तर

देवाचं दर्शन घेतल्यानंतर लोक मंदिराच्या गाभाऱ्यात का बसतात? अनेकांना माहिती नाही उत्तर, कारण...
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 12, 2026 | 3:13 PM
Share

आपण मंदिरात गेल्यावर देवाचे दर्शन घेतो, प्रदक्षिणा घालतो आणि त्यानंतर काही वेळ मंदिराच्या पायरीवर किंवा आवारात शांत बसतो. ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. मात्र दर्शन झाल्यानंतर लगेच मंदिरातून बाहेर न पडता काही क्षण शांत बसण्यामागे केवळ विश्रांती नसून त्यामागे आध्यात्मिक, मानसिक आणि वैज्ञानिक कारणे असल्याचे मानले जाते.

धार्मिक मान्यतेनुसार मंदिरांची रचना अशा ठिकाणी केली जाते, जिथे पृथ्वीच्या चुंबकीय लहरी अधिक सक्रिय असतात. मंदिरातील गाभाऱ्यात असलेल्या देवाच्या मूर्तीखाली अनेकदा तांब्याचा तुकडा बसवलेला असतो. हा तांबा त्या ठिकाणची सकारात्मक ऊर्जा आकर्षित करून साठवून ठेवतो असे मानले जाते.

जेव्हा भक्त मंदिरात जाऊन श्रद्धेने देवाचे दर्शन घेतो तेव्हा त्या वातावरणातील सकारात्मक ऊर्जा त्यांच्या शरीरावर आणि मनावर परिणाम करते. त्यामुळे दर्शनानंतर लगेच बाहेर पडण्याऐवजी काही वेळ मंदिरात बसल्यास ती ऊर्जा शरीरात टिकून राहते आणि मन अधिक शांत व स्थिर होते असे सांगितले जाते.

मन शांत करण्यासाठी काही क्षण आवश्यक

मंदिराच्या गाभाऱ्यात हे आध्यात्मिक आणि भौतिक जग यांना जोडणारा एक प्रकारचा सेतू मानला जातो. त्यामुळे दर्शनानंतर काही मिनिटे शांत बसल्याने मनातील विचारांची गर्दी कमी होते. त्या काही क्षणांत व्यक्ती स्वतःच्या विचारांचे आणि कृतींचे आत्मपरीक्षण करू लागतो. मन स्थिर झाल्यावर जीवनातील समस्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची ताकद मिळते.

धार्मिक ग्रंथांमध्ये मंदिरात बसून निरर्थक गप्पा मारण्याऐवजी प्रार्थना करण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः हा श्लोक म्हणण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे:

अनायासेन मरणं, विनादैन्येन जीवनम् । देहान्ते तव सान्निध्यं, देहि मे परमेश्वरम् ॥

या श्लोकाचा अर्थ असा सांगितला जातो की, ‘हे परमेश्वरा, माझे जीवन परावलंबी नसावे, मृत्यू सहज आणि वेदनारहित व्हावा आणि शेवटच्या क्षणी तुझे सान्निध्य लाभावे.

मंदिरात दर्शनानंतर काही क्षण शांत बसणे ही केवळ धार्मिक परंपरा नसून मनाला शांतता देणारी आणि सकारात्मक विचारांची ऊर्जा मिळवून देणारी प्रक्रिया मानली जाते. त्यामुळे आजही अनेक भक्त दर्शन घेतल्यानंतर काही वेळ मंदिराच्या आवारात बसून प्रार्थना करतात आणि मगच घरी परततात.

Follow Us
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?