AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata Company: टाटाच्या कंपनीने कमावलं 1401 कोटीचं प्रॉफिट, या शेअर्सचे वाढू शकतात भाव

टाटा पॉवरने जून तिमाहीसाठी अपेक्षेपेक्षा चांगले निकाल जाहीर केले. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक तुलनेत 11% वाढून ₹1401 कोटी झाला. हा नफा ₹1,185 कोटी असण्याचा अंदाज होता.

Tata Company: टाटाच्या कंपनीने कमावलं 1401 कोटीचं प्रॉफिट, या शेअर्सचे वाढू शकतात भाव
| Updated on: Jul 28, 2026 | 9:16 AM
Share

टाटा पॉवरने जून तिमाहीसाठी अपेक्षेपेक्षा चांगले निकाल जाहीर केले. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक तुलनेत 11% वाढून ₹1401 कोटी झाला. हा नफा ₹1,185 कोटी असण्याचा अंदाज होता. महसूल 5.6% वाढून ₹19.501 कोटी झाला, जो ₹18.657 कोटींच्या अंदाजापेक्षा जास्त होता. कंपनीचा EBITDA ₹4,013 कोटी होता, जो अपेक्षेपेक्षा चांगला होता. ऑपरेटिंग मार्जिन गेल्या वर्षीच्या 23% वरून 21.07% पर्यंत घसरला. टाटा पॉवरने म्हटले आहे की, या तिमाहीत रिन्यूएबल एनर्जी, ट्रान्समिशन आणि जनरेशन हे व्यवसाय कंपनीच्या वाढीचे मुख्य चालक होते. तिमाहीत कंपनीच्या एकूण नवीन क्षमतेपैकी 86% वाटा  क्लीन एनर्जीचा होता. दरम्यान, राष्ट्रीय विजेची मागणी देखील वार्षिक 8.5% नी वाढली. कंपनीने या तिमाहीत ₹5,735 कोटींची भांडवली गुंतवणूक केली. ही आतापर्यंतची कंपनीची सर्वात मोठी तिमाही गुंतवणूक आहे.

रूफटॉप सोलर कामगिरी

रूफटॉप सोलर व्यवसायानेही दमदार कामगिरी केली. कंपनीने तिमाहीत 371 मेगावॅट पीक क्षमतेची रूफटॉप सोलर प्रणाली स्थापित केली, जी मागील वर्षाच्या तुलनेत 37% वाढ आहे. सार्वजनिक आणि बस ईव्ही चार्जिंग नेटवर्कचा विस्तार 7,200 हून अधिक चार्जिंग पॉईंट्सपर्यंत झाला. सौर ऊर्जा निर्मिती व्यवसायानेही दमदार कामगिरी केली. कंपनीने विक्रमी 1,001 मेगावॅट क्षमतेचे सोलर मॉड्यूल्स आणि 862 मेगावॅट क्षमतेचे सोलर सेल्सचे उत्पादन केले. या व्यवसायातून मिळणारा महसूल 53 % वाढून ₹2,462 कोटी झाला. EBITDA 113% वाढून ₹626  कोटींवर पोहोचला. PAT 287% वाढून ₹371 कोटी झाला. कमी खर्च आणि उत्तम विक्री मिश्रणामुळे कंपनीच्या नफ्यात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले.

मुंबई प्लांटमधील सुधारित कामगिरी, मुंद्रा पॉवरकडून मिळालेला अतिरिक्त महसूल आणि हल्दिया प्लांटमधील सुधारित मार्जिनमुळे वीज निर्मिती आणि कोळसा व्यवसायाला फायदा झाला. या क्लस्टरच्या नफ्यात 27% वाढ झाली. ट्रान्समिशन और डिस्ट्रीब्यूशन व्यवसायातही परतावा सुधारला आणि नवीन प्रकल्पांमधून महसुलात वाढ झाली. राजस्थान आणि गुजरातमधील नवीकरणीय ऊर्जा उत्पादनावर काही प्रमाणात परिणाम झाला. मात्र, छतावरील सौरऊर्जा आणि उत्पादन क्षेत्रातील वाढीमुळे याची भरपाई झाली. निकाल जाहीर होण्यापूर्वी, टाटा पॉवरचे शेअर्स सोमवारी 1.23% नी वाढून ₹379 वर बंद झाले. गेल्या सहा महिन्यांत कंपनीने 8.99% परतावा दिला आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार